शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

पुण्यातील महालोकअदालतमध्ये ४४ हजार ७०१ दावे निकाली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 3:05 AM

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने रविवारी पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या महालोकअदालतमध्ये ४४ हजार ७०१ दावे निकाली काढण्यात आले आहेत.

पुणे : पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने रविवारी पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या महालोकअदालतमध्ये ४४ हजार ७०१ दावे निकाली काढण्यात आले आहेत. त्यापैकी ४१ हजार ११६ खटले दाखलपूर्व आहेत. तर उर्वरित ३ हजार ५८५ दावे प्रलंबित स्वरूपाचे आहेत. राज्यात सर्वाधिक दावे पुणे जिल्ह्यात निकाली काढण्यात आले आहे़ या दाव्यात ६७ कोटी २१ लाख ६८ हजार १३५ रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे.विधी सेवाचे सचिव चेतन भागवत यांनी या महालोकअदालतीतील झालेल्या कामकाजाची माहिती दिली़पुणे जिल्ह्यातील न्यायालयात रविवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये १ लाख ४२ हजार७३८ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यामध्ये २४ हजार ५९९ प्रलंबित दावे तर, १ लाख १८ हजार १३९ दाखलपूर्व स्वरुपाचे दावे होते़ निकाली काढण्यात आलेल्या प्रलंबित दाव्यात किरकोळ फौजदारी स्वरूपाचे १ हजार १९, धनादेश न वटल्याचे १ हजार २७७, बँकांशी संबंधी १०७, मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे २८१, कामगार वाद ६९, वीज, पाणीपट्टी संदर्भात ५३, कौटुंबिक वादासंबंधी १८३, जमिन वादासंबंधी ३७७ आणि इतर ४६८ दाव्यांचा समावेश आहे. या सर्व दाव्यात मिळून ३८ कोटी ५१ लाख ३४ हजार ७०० रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे.तडजोड झालेल्या दाखलपूर्व दाव्यात बँक रिकव्हरीचे ३ हजार ३९६, वीज आणि पाणीपट्टीच्या ३३ हजार ५२० आणि इतर ४ हजार २०० दाव्यांचा समावेश आहे. या दाव्यात २८ कोटी ७० लाख ३३ हजार ४३५ रुपये नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणे