या वेळी उपाध्यक्ष बापूसाहेब फडतरे, सचिव जयवंत फडतरे, खजिनदार शिवाजी जगदाळे, विश्वस्त नागेश फडतरे, नामदेव फडतरे, प्रकाश फडतरे, सुरेश फडतरे, आनंदराव फडतरे, प्रकाश आप्पा फडतरे, दीपक फडतरे, महादेव फडतरे आदींसह बोपगाव पंचक्रोशी पदाधिकारी उपस्थित होते.
कानिफनाथ गड हे भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे श्रीक्षेत्र म्हणून अत्यंत प्रसिद्ध आहे. भाविकांची गडावर मोठ्या संख्येने ये-जा असते . परंतु हा रस्ता नादुरुस्त झाल्याने रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी भाविकांची होती. रस्त्याचे दुतर्फा गावकऱ्यांची घरे आहेत. ही अडचण देवस्थानच्या वतीने देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानोबा फडतरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितली. त्यांच्या आदेशाने हा रस्ता मंजूर झाला आहे.
याकामी पुरंदर तालुक्याचे आमदार संजय जगताप व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे शिफारस केली होती.
देवस्थानच्या वतीने विश्वस्त व माजी सरपंच प्रकाशभाऊ फडतरे यांनी आभार मानले.