शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

भामा आसखेडच्या ३२३ प्रकल्पग्रस्तांना ४५ कोटींचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 8:04 PM

प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतरच शहरांना पाणी पुरवठा मिळणे शक्य होणार अद्याप ५५६ प्रकल्पग्रस्तांना निधीचे १४४.१२ कोटी रुपये देणे शिल्लक

ठळक मुद्देपुणे महापालिकेच्या आयुक्त शेखर गायकवाड घेणार आज आढावा बैठकअद्याप ५५६ प्रकल्पग्रस्तांना निधीचे १४४.१२ कोटी रुपये देणे शिल्लक

पुणे : पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाचा व गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भामा आसाखेडचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी गुरुवार (दि.३०) रोजी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली आहे. भामाआसखेडच्या ३२३ प्रकल्पग्रस्तांना आता पर्यंत ४५ कोटींचे वाटप केले आहे. अद्याप ५५६ प्रकल्पग्रस्तांना निधीचे वाटप शिल्लक आहे. यासाठी १४४.१२ कोटी रुपये देणे शिल्लक आहे. प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतरच शहरांना पाणी पुरवठा मिळणे शक्य होणार आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले की, सन १९८९ मध्ये भामा आसखेड प्रकल्प मंजूर करताना शेती सिंचन हाच मुख्य उद्देश होता. परंतु शासनाने पुमे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि औद्योगिक विकास महामंडळ या संस्थांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धरणाचे सिंचन क्षेत्र रद्द करुन केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण निश्चित केले. धरणाचे सिंचन क्षेत्र रद्द झाल्याने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर या संदर्भांत पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि तत्कालीन पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या बदल्यात हेक्टरी १५ लाख रुपये मोबदला देण्याचा निर्णय घेतला. यासाठी राज्य शासनाने ८ मार्च २०१९ रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दोन्ही महापालिकांनी आपल्या पाण्याच्या मंजूर कोट्याच्या हिश्यानुसार प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा कर्च आदा करण्याचे आदेश दिले. पुणे महापालिकेला भामा आसखेड प्रकल्पातून २.६४ टीएमसी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी २.१२ टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर केला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने १३० कोटी ३३ लाख रुपये आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने १०४ कोटी ६७ लाख रुपये जिल्हा पुनर्वसन अधिकाºयांना प्रकल्पग्रस्तांना वाटपासाठी देणे आवश्यक आहे. आता पर्यंत पुणे महापालिकेने २५ कोटी रुपये व पिंपरी-चिंचवड महापालिकेने २० कोटी ८७ लाख रुपये जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना दिले आहेत. या निधीतून ९७९ प्रकल्पग्रस्तांपैकी ३२३ प्रकल्पग्रस्तांना ४५ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. अद्याप ही ५५६ प्रकल्पग्रस्त मदतीच्या प्रतिक्षेत असून, दोन्ही महापालिकेकडून शिल्लक राहिलेली रक्कम जमा केल्यानंतर त्वरीत वाटप करण्यात येईल, असे वाघमारे यांनी स्पष्ट केले. यामुळे गुरुवार (दि.३०) रोजी महापालिकेच्या आयुक्त कार्यालयामध्ये होणाऱ्या बैठकीत शिल्लक निधी लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वाघमारे यांनी सागंतिले.--- निधीचे वाटपासाठी पात्र लाभार्थी : ९७९- आता पर्यंत पैसे वाटप झालेले लाभार्थी : ३२३- एकूण पैसे वाटप : ४५ कोटी- शिल्लक लाभार्थी  : ५५६

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीcommissionerआयुक्तGovernmentसरकार