पुणे : आणीबाणीच्या मुद्द्यांवरून भाजपकडून सातत्याने काँग्रेसला लक्ष केले जात असते. आज देखील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर आणीबाणीच्या घटनेचा संदर्भ घेत टीका करण्याची संधी सोडली नाही.देशात आणीबाणी जाहीर केलेल्या घटनेला शुक्रवारी ( दि. २५) ४६ वर्ष पूर्ण होत आहे. याच धर्तीवर पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे काँग्रेसवर टीका केली आहे. या ट्विटमध्ये पाटील म्हणतात, 'गरीबी हटाव’च्या घोषणा हवेतच विरल्या. दारिद्र्य निर्मूलनाचे स्वप्न दाखवणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने आणीबाणीच्या काळात राबवलेल्या आर्थिक धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था मोडकळीस आली आणि याचे भारतावर दूरगामी परिणाम झाले. याचबबरोबर त्यांनी आणीबाणी हे काँग्रेसचं लोकशाही पायदळी तुडवण्याचं लांच्छनास्पद कारस्थान असल्याची टीका देखील केली आहे.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतीय अर्थव्यवस्था संपूर्णरित्या उद्धवस्त केली, अर्थचक्राची गती मंदावली, बेरोजगारी वाढली आणि सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले. ‘गरिबी हटाव’ अशी घोषणा देणाऱ्या इंदिरा गांधींनी प्रत्यक्षात मात्र ‘गरिबी बढाव’च्या दिशेनेच कृती केली असल्याचेही पाटील यांनी ट्विटसोबत केलेल्या फोटोत म्हटले आहे. तसेच इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतीय अर्थव्यवस्था संपूर्णरित्या उद्धवस्त केली, अर्थचक्राची गती मंदावली, बेरोजगारी वाढली आणि सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले. ‘गरिबी हटाव’ अशी घोषणा देणाऱ्या इंदिरा गांधींनी प्रत्यक्षात मात्र ‘गरिबी बढाव’च्या दिशेनेच कृती केली असल्याची टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी या ट्विट मध्ये केली आहे.
संविधानाला धक्का लावणाऱ्या आणि प्रशासनाच्या जबाबदाऱ्या कमी करणाऱ्या ५ प्रमुख घटनादुरुस्ती संसदेत सत्ताबळाचा वापर करून मंजूर करण्यात आल्या. ३८व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून २५ जून १९७५ रोजी करण्यात आलेल्या आणीबाणीच्या विध्वंसक घोंष्णेला न्याययंत्रणेच्या चौकटीतून वगळण्यात आले असेही चंद्रकांत पाटलांनी ट्विट केलेल्या फोटोत म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींचंही आणीबाणीच्या घटनेचा निषेध व्यक्त करणारं ट्विट
आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही. १९७५ ते १९७७ या काळात संस्थांचा नाश झाला. आपण भारतीय लोकशाही भावनांना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प करूया आणि राज्यघटनेत नमूद केलेल्या मूल्यांचे पालन करुया असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.