शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

Pune Crime | पुण्यात भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवून ४७ लाख लुटले; नाना पेठेतील घटना

By विवेक भुसे | Published: March 23, 2023 8:29 PM

चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून ही लुट केल्याचे दिसून येत आहे...

पुणे : दुकानात जमा झालेली रोख रक्कम बँकेत भरण्यासाठी घेऊन जाणार्या कर्मचार्या रस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील ४७ लाख २६ हजार रुपयांची बॅग दोघा चोरट्याने पळून नेली. नाना पेठेतील आझाद आळी येथे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला. दुकान ते बँक हे अवघे एक ते दोन किलोमीटर अंतर असताना हा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून ही लुट केल्याचे दिसून येत आहे.

याबाबत मंगलपुरी भिकमपूरी गोस्वामी (वय ५५, रा. मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोस्वामी हे नाना पेठेतील पिंपरी चौकाजवळील पन्ना एजन्सीमध्ये ४० वर्षांपासून कामाला आहेत. विविध कंपन्यांचे सिगारेट व बडीशेपचे ते वितरक आहेत. दुकानात जमा झालेली रोख रक्कम हे दररोज बँकेत भरतात. गुढी पाडव्यामुळे बुधवारी बँकेला सुट्टी असल्याने दुकानात दोन दिवसांची रोकड जमा झाली होती.

गोस्वामी हे गुरुवारी सकाळी ९ वाजता नेहमीप्रमाणे दुकानात आले. त्यांनी जमा झालेली ४७ लाख २६ हजार रुपयांची रोकडे मोजून एका बँगेत ठेवली. त्याबराेबर १० धनादेश घेऊन ते सकाळी साडेअकरा वाजता दुचाकीवरुन बँकेत निघाले. पैशांची बॅग त्यांनी पायाजवळ ठेवली होती. गाडीवरुन जात असताना आझादआळी येथे पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. परंतु, त्यांनी स्वत:चा तोल सावरला. तेव्हा धक्का देणार्याने त्याची गाडी आडवी घातली. मागे बसलेल्याने आली उतरुन गाडी नीट चालवता येत नाही का असे विचारले. त्यावर गोस्वामी यांनी मी गाडी सरळ चालवत आहे. तुम्हीच मला मागून येऊन धक्का दिला आहे, असे म्हणाले.

त्यावरुन त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यांच्यातील एकाने गोस्वामी यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला हाताने फटका मारला. दोघांनी पैशांची बॅग ओढली. तेव्हा त्यांनी ती घट्ट धरली. यावेळी झटापट सुरु झाल्याने रस्त्यावरील काही लोक तेथे आले. तेव्हा मागे बसलेल्याने कमरेला लावलेला कोयता काढून त्यांच्यावर उगारला. दोघेही त्यांना मारहाण करुन लागले. गोस्वामी खाली पडल्यावर चोर चोर असे ओरडू लागले. तेव्हा त्यांनी त्यांच्या हातातील बॅग जबरदस्तीने ओढून घेऊन ते दुचाकीवरुन इंडियन बँकेकडील रोडने पळून गेले. यावेळी जमलेल्या लोकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पळून गेले. लोकांनीच पोलिसांना याची खबर दिली.

भर दिवसा लुटमारीचा प्रकार घडल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गाेवेकर आदि अधिकार्यांनी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने सूचना केल्या.

फिर्यादी हे नेहमी त्याच वेळेला व त्याच रोडने दररोज जातात. एकटेच असतात. हे लक्षात घेऊन पाळत ठेवून ही लुट केल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांनी ओळख लपविण्यासाठी तोंडाला मास्क लावला होता. सीसीटीव्हीच्या सहाय्याने त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी पोलिसांची पथके तयार केली आहेत.राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त

पाळत ठेवून लुटले

  • दुकानापासून पाठलाग करुन संधी मिळताच दिली धडक
  • गुढी पाडव्याची सुट्टीमुळे मोठी कॅश मिळण्याची शक्यता घेऊन केले कृत्य
  • दोघांपेक्षा अधिक जण सहभागी असण्याची शक्यता

 

रोकड घेऊन जाताना घ्या काळजी

  • दुकानात जमा होणारी रोकड घेऊन जाताना पुरेशी काळजी घेतली नसल्याचे या प्रकरणात दिसून येत आहे.
  • दुकान ते बँक हे अंतर कमी असेल तरी इतकी मोठी रक्कम घेऊन जाताना बरोबर कोणाला तरी घेऊन जावे.
  • अशी रक्कम घेऊन जाताना रोड व वेळा नेहमी बदलत्या ठेवाव्यात
  • दुचाकीवरुन एकट्याने जाण्याऐवजी नेहमी बरोबर कोणाला तरी न्यावे
  • अशा रक्कमा नेताना कारचा वापर करावा, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस