पुणे : नवीन शिक्षक बदलीधोरणाच्या विरोधात पुण्यात सर्व शिक्षक संघटना एकत्रित आल्या असून तीन टप्प्यात त्यांनी आंदोलनाची दिशा ठरविली आहे. ४ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरीय मोर्चा काढण्यात येणार असून यात पुणे जिल्ह्यातील १० हजार शिक्षक सहभागी होणार असल्याचे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सोमवारी सासवड येथे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या सभेत राज्यव्यापी आंदोलनाचा ठराव करण्यात आला होता. त्यानुसार पुढील दिशा ठरविण्यासाठी बुधवारी पुण्यात बैैठक घेण्यात आली. या बैैठकीला त्यांनी सर्वच शिक्षक संघटनांना आमंत्रित केले होते. त्यानुसार बहुतांश शिक्षक संघटना आज एकत्रित आल्या व सर्वांनी या धोरणाविरोधात लढा देण्याचे ठरविले आहे. यावेळी शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, शिक्षक समितीचे अध्यक्ष काळूराम बोरसे, शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट)चे अध्यक्ष राजाराम वरुटे, मधुकर काठोळे, मागासवर्गीय संघटनेचे शामराव जवंजाळ, राजेश सुर्वे, काशिनाथ भोईर, चिंतामण वेळवडे, अंबादास वाजे, आप्पासाहेब कुल, एन. वाय. पाटील, उदय शिंदे, रावसाहेब रोहकले आदी राज्य पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण राज्यात एकाच वेळी भव्य मोर्चे करण्याचे नियोजन झाले.त्यानुसार पहिल्या टप्प्यात ४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पुण्यातील आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा होणार असून १० हजार शिक्षक यात सहभागी होणार आहेत. यानंतर त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यस्तरीय मोर्चा काढ्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात राज्यातील ४ लाख शिक्षक मोर्चा काढणार आहेत. आझाद मैदानावर हा मोर्चाचे संघटनांचे नियोजन आहे. यानंतरही शासनाने धघेरण बदलले नाही तर मात्र शिक्षक सामुहिक रजेवर जावून शाळा बंद करतील असा इशारा आज या संघटनांनी दिला आहे. अंगणवाडी, एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनापेक्षा मोठे आंदेलन शिक्षकांचा होईल असे, मारणे यांनी सांगितले.
शिक्षक प्रतिनिधींशी संवादाची पद्धत बंद केल्याने शासनावर ही वेळ आली आहे. राज्यभरातून चार लाख शिक्षक एकाच वेळी रस्त्यावर उतरतील.- बाळासाहेब मारणे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ पुणे
सहभागी प्रमुख संघटनामहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीमहाराष्ट्र राज्य पदवीधर व केंद्रप्रमुख संघटनाअखिल शिक्षक संघमहाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनामहाराष्ट्र राज्य शिक्षक सेनामहाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटनाजूनी पेन्शन हक्क संघटनउर्दु शिक्षक संघटनाएकल शिक्षक संघटना स्वाभिमानी शिक्षक संघटना
प्रमुख मागण्यानवीन बदली धोरण दुरुस्ती करावीनवीन वरिष्ठ वेतनश्रेणी आदेश रद्द करावाअंशदायी पेन्शन योजना बंद करून जूनी पेन्शन योजना लागू करावीअनावश्यक आॅनलाईन कामे बंद करावी