शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Pune: बनावट सह्या करुन ५ कोटींचे कर्ज, वैशाली हॉटेलच्या मालकिणीची पतीविरोधात तक्रार

By विवेक भुसे | Published: October 04, 2023 3:48 PM

वैशाली हॉटेलच्या मालकिणीने आपल्या पतीसह त्यांना कर्ज देणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिली आहे...

पुणे : बनावट सह्या करुन बनावट दस्त तयार करुन फ्लॅट तारण ठेवून त्याद्वारे ४ कोटी ९७ लाख ५ हजार रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी वैशाली हॉटेलच्या मालकिणीने आपल्या पतीसह त्यांना कर्ज देणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी निकिता जगन्नाथ शेट्टी (वय ३४, रा. मोदीबाग, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्वजीत विनायकराव जाधव (वय ४१), डी एस ए ( आर आर फायनान्सचे) रवी परदेशी आणि कोटक महिंद्रा बँक येरवडा शाखेचे मॅनेजर राजेश देवचंद्र चौधरी (वय ४२, रा. येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फर्ग्युसन रोडवरील निकिता हॉस्पिटलिटी एलएलपीच्या कार्यालयात ७ डिसेबर २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता शेट्टी व विश्वजीत जाधव हे पतीपत्नी आहेत. फर्ग्युसन रोडवरील वैशाली हॉटेलच्या मालकीवरुन त्यांच्यात वाद निर्माण झाला असून त्यांनी एकमेकाविरुद्ध अनेक तक्रारी केल्या आहेत. आता फसवणुकीची तक्रार केली आहे.

फर्ग्युसन रोडवरील निकिता हॉस्पिटॅलिटी एलएलपी या कंपनीच्या कार्यालयात विश्वजीत जाधव याने बैठका घेऊन कट रचला. फिर्यादी यांच्या खोट्या सह्या करुन या सह्या खर्या असल्याचे भासवून त्यांच्या आधारे बनावट दस्त तयार केले. फिर्यादीच्या मालकीचा फ्लॅट त्यांच्या परवानगीशिवाय तारण ठेवून त्या बदल्यात कर्ज घेऊन ४ कोटी ९७ लाख ५ हजार रुपयांचा अपहार करुन फसवणूक केली. डेक्कन पोलिसांनी हा गुन्हा दाखल करुन अधिक तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीhotelहॉटेल