बारामती : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 14 डिंसेबर रोजी होणा:या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी यंदा 5 लाख 4 हजार अर्ज दाखल झाले आहेत. मागील वर्षी या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून सहा लाखांहून अधिक अर्ज आले होते.
या परीक्षेसाठी मुंबई, पुणो, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, लातूर, नागपूर विभागातून अर्ज मागवण्यात आले होते. मार्च 2क्14 च्या राज्य शासनाच्या निर्णयानुसार शिक्षक होऊ इच्छिणा:या डी. एड. किंवा बी. एड. उत्तीर्ण विद्याथ्र्यांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. या परीक्षेमुळे सवरेत्तम पात्रताधारक शिक्षकांची निवड होणार आहे.
खासगी, तसेच सरकारी शाळांमध्येही पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणा:या शिक्षकांनाच काम करता येणार आहे. मात्र, या परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्र म आणि
मागील वर्षीचा कमी लागलेला निकाल, तसेच अर्ज भरण्यात
येत असलेल्या तांत्रिक अडचणी, वेबसाईट बंद पडणो या वर्षी काही प्रमाणात तशाच होत्या.
विशेषत: चलन भरण्यात आलेल्या अडचणींमुळे अर्जाचे प्रमाण कमी झाले आहे. तर, पुणो जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांच्या मते मागील
वर्षी अर्ज केलेल्यांपैकी बरेच
उमेदवार अन्य खात्यामध्ये भरती झाल्यामुळे या वर्षी कमी अर्ज आले आहेत.
यंदा कोल्हापूर जिल्ह्यातून अद्यापर्पयत 11284 अर्ज दाखल झाले आहेत. तर , गतवर्षी टीईटीसाठी 21 हजार अर्ज दाखल करण्यात आले होते. पुणो जिल्ह्यातील अहमदनगर, पुणो, सोलापूरचा समावेश होता. पुणो जिल्ह्यातील आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरूर, वेल्हे, पिंपरी-चिंचवड, पुणो महापालिका (पूर्व), पुणो महापालिका (पश्चिम), पुणो महापालिका (दक्षिण) येथे अर्ज दाखल करण्याचे केंद्र होते. या वर्षी पुणो जिल्ह्यातून 18 हजार 28 अर्ज आले आहेत. मात्र, गेल्या वर्षी 3क् हजार अर्ज प्राप्त झाले होते, असे शेख यांनी सांगितले. (वार्ताहर)
4बारामती तालुक्यातून 1564 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ‘ऑनलाइन’ अर्ज भरलेल्या उमेदवारांसाठी 1 ते 1क् नोव्हेंबर्पयत अर्ज भरताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या परीक्षेसाठी डी.एड.च्या (मराठी माध्यम) 1क्31, तर डी.एड.(इंग्रजी माध्यम)च्या 16 उमेदवारांनी अर्ज केला आहे. तर, बी. एड. (मराठी माध्यम) 5क्1 आणि बी. एड. (इंग्रजी माध्यम) 16 अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी के. एस. दोडके यांनी दिली. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज दुरुस्तीसह सादर करण्याची मुदत 27 ऑक्टोबर्पयत होती.
यंदा पुणो जिल्ह्यातून आतार्पयत 18 हजार 28 अर्ज प्राप्त झाले आहेत. यात आणखी दोन ते अडीच हजारांची भर पडण्याची शक्यता आहे. उमदेवारांच्या मागणीनुसार त्यांना चुकांची दुरुस्ती करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.
- मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विभाग, पुणो जिल्हा परिषद