लाेकमत न्यूज नेटवर्क
महुडे : भोर शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाकाळात लॉकडाऊन असतानाही विनाकारण फिरणे काही जणांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी एका महिन्यात ७९३ जणांवर कारवाई करून ५ लाख २४ हजार रुपयांचा वसूल केला आहे.
भोर पोलीस स्टेशनच्या वतीने भोर शहरात व ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणारे, तसेच मास्क न वापरणारे, विनामास्क गर्दीत वाहन चालविणारे, सोशल डिस्टन्सिंगचा पालन न करणारे, कलम १४४ चे उल्लंघन करणारे इत्यादी व्यक्तींवर विविध पथकाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात आली. १५ एप्रिल ते १८ मे दरम्यान ही कार्यवाही करण्यात आली आहे. विना मास्क ७५४ केसेस करण्यात आल्या. विना परवाना (ई-पास नसलेले)धारकांकडून ०४ लाख १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोना कालावधीत नियमाचे उल्लंघन करून बेकायदेशीर, १३ दुकाने सील करण्यात आले. ०४ दुकानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. लग्नकार्यात गर्दी, लॉकडाऊन काळात बांधकाम चालू ठेवणे, प्रमाणपेक्षा जादा प्रवासी वाहतूक प्रकरणी पाच जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ०१ लाख ९००० हजार दंड वसूल करण्यात आला. एकूण ७९३ केसेस वर दंडात्मक एकूण ५ लाख २४ हजार रुपये पोलिसांनी वसूल केले.