ओतूर आरोग्य केंद्र परिसरातील १९ गावांपैकी शुक्रवारी ओतूर शहरात ३ व आलमे गावात २ नवीन रुग्ण सापडले आहेत. बाकी १७ गावांना शुक्रवारी दिलासा मिळाला आहे. या नवीन ५ रुग्णांमुळे परिसरातील बाधितांची संख्या २ हजार ३२३ झाली आहे. २ हजार ९५ बरे झाले आहेत. ९९ जण कोविड सेंटर तर ३४ जण घरीच उपचार घेत आहेत. परिसरातील ९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.
शुक्रवारी सापडलेल्या ३ रुग्णांमुळे ओतूर शहरातील बाधितांची संख्या १ हजार २० झाली आहे. ९१४ बरे झाले आहेत. ४३ जण विविध ठिकाणी कोविड सेंटरमध्ये तर २६ जण घरातच उपचार घेत आहेत. ३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आलमे गावातील बाधितांची संख्या २२ पैकी १३ बरे झाले आहेत. २ जणांवर उपचार सुरु केले आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे, असे डॉ. सारोक्ते यांनी सांगितले.