शहरं
Join us  
Trending Stories
1
भावना गवळी, कृपाल तुमानेंना विधानपरिषदेची उमेदवारी; शिंदे गटात नाराजी
2
हाथरस येथील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला, रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठीही उरली नाही जागा   
3
"हिंदूंना विचार करावा लागेल, हा अपमान योगायोग की प्रयोग'; लोकसभेत काय म्हणाले PM मोदी?
4
"आजकल बच्चे का मन बहलाने का काम चल रहा है...", निवडणूक निकालावरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
"सलग तिसऱ्यांदा १०० च्या आत, तिसरा पराभव, तरीही काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम...", मोदींचा खोचक टोला
6
“जयंत पाटील तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"मतदारांनी काँग्रेसलाही जनादेश दिला, तो विरोधी बाकावर बसण्याचा", PM मोदींची बोचरी टीका...
8
“तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम, विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार”; PM मोदींची लोकसभेत गॅरंटी
9
"2014 पूर्वी देशात घोटाळ्याचा काळ होता...", लोकसभेतून PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
किंग खानच्या शिरपेचात मानाचा तुरा! 'या' इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखचा होणार खास सन्मान
11
"अब की बार चोको बार", DMK खासदारानं भाजपच्या घोषणेची उडवली खिल्ली!
12
विश्वास वाढवणारा विश्वविजय! देशाने पाहिलेलं गोड स्वप्न साकार होतं तेव्हा...
13
काँग्रेसमधून निवडून आलेलो याचा मला गर्व, शंका नसावी; अशोक चव्हाणांचे राज्यसभेत वक्तव्य 
14
“मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहीण”; विधान परिषद उमेदवारीवर भावना गवळींची प्रतिक्रिया
15
"राहुल गांधींना 'अभय मुद्रे'संदर्भात ज्ञान नाही; मी त्यांना..."! रामभद्राचार्य स्पष्टच बोलले
16
“राहुल गांधींकडून हिंदू धर्माचा अपमान झाला नाही”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट, भाजपावर टीका
17
इस्लाममध्येही असते ‘अभय मुद्रा’? राहुल गांधींचा दावा अजमेरच्या चिश्तींनी फेटाळला, म्हणाले, तसा कुठलाही...
18
लफडे... अन् ब्लॅकमेल! तीन वर्षांपासून ज्या तरुणीने १० लाख वसूल केले, ती पत्नीच निघाली
19
“हीच वेळ आहे, आम्ही गेल्यावर तुम्ही एकत्र येणार का”; मनोज जरांगेंचा मराठा नेत्यांना सवाल
20
Airtel आणि Jioच्या ग्राहकांकडे आज अखेरची संधी, स्वस्तात करा रिचार्ज; उद्यापासून प्लान्स महागणार

लोणावळ्यात धबधब्यातून एकाच कुटुंबातील ५ जण गेले वाहून; दोघांचे मृतदेह सापडले, तिघांचा शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 7:45 PM

लोणावळ्याच्या मागील बाजूस असणाऱ्या धबधब्यात वर्षाविहार करताना अचानक प्रवाह वाढल्याने ते कुटुंब वाहून गेले

लोणावळा : लोणावळा शहरात वर्षविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील सगळ्यांना जीव  गमवावा लागला आहे. भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या एका धबधब्याच्या प्रवाहातून ५ जण धरणात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यापैकी २ जणांचा मृतदेह सापडला असून इतर तिघांचा शोध शिवदुर्ग रेसक्यू पथकाकडून सुरु आहे. रविवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.      लोणावळा परिसरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित होऊन धरणात येत असल्याने दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हर फ्लो झाले आहे. सकाळच्या सत्रात धरण परिसरात पर्यटनासाठी आलेले काही पर्यटक रेल्वेचे विश्रांती गृह असलेल्या भागात डोंगरातून वाहणाऱ्या धबधब्यातून वाहणाऱ्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेत होते.

दरम्यान सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सदरचा धबधब्यातील पाणी वाढत होते, पाण्याच्या या प्रवाहामुळे ५ जण पाण्याच्या वेगाने धरणात वाहून गेले. ही माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह त्यांची टीम तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक, मावळ वन्य जीव रक्षक टीम व स्थानिक युवक यांनी घटनास्थळी जात शोध मोहीम सुरू केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार हे कुटुंब वानवडी येथील सय्यदनगर भागातील आहेत.

टॅग्स :PuneपुणेlonavalaलोणावळाWaterपाणीRainपाऊसFamilyपरिवारPoliceपोलिसDeathमृत्यू