शहरं
Join us  
Trending Stories
1
टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय
2
Big Breaking: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी
3
“CMपदाच्या चेहऱ्यापेक्षा महाभ्रष्ट महायुती सरकार घालवणे महत्त्वाचे”: बाळासाहेब थोरात
4
"सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
5
कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...
6
स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या आरोपांनंतर मोठी घोषणा
7
अरे देवा! जेलमध्ये रामलीला, कैद्यांनी केला वानरांचा रोल; सीतेला शोधायला गेले अन् पळाले
8
Reliance Jio नं लाँच केले २ नवे रिचार्ज प्लॅन्स; केवळ १ रुपयाचा फरक, कोणता आहे बेस्ट? 
9
भाजपा खासदाराने आश्रमात घुसून साधूला केली मारहाण, संतप्त अनुयायांचं आंदोलन
10
कॉमेडीशी संबंध नसताना प्राजक्ताला कसा मिळाला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो? आधी नकार दिला पण...
11
'सिंघम अगेन'सोबत 'भूल भूलैय्या ३'ची मोठी टक्कर! अखेर कार्तिक आर्यनने सोडलं मौन; म्हणाला-
12
'दिवसाढवळ्या हत्या होत असतील तर बरोबर नाही, सलमान खानच्या जवळच्यांना सुरक्षा पुरवा'; मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
13
“राज्यात एक फूल दोन हाफ सिंघम, मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करावा”; संजय राऊतांचा हल्लाबोल
14
नीना गुप्तांनी शेअर केला नातीचा गोड फोटो, म्हणाल्या- "माझ्या मुलीची मुलगी..."
15
उद्यापासून आचारसंहिता लागणार? महायुती सरकारची आज शेवटची मंत्रिमंडळ बैठक!
16
चौदाव्यांदा बोनस शेअर देण्याच्या तयारीत 'ही' दिग्गज कंपनी, स्टॉकनं १ लाखाचे केले ४० लाख; जाणून घ्या
17
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची सुरक्षा वाढवली, IB च्या अलर्टनंतर सुरक्षेत बदल
18
पाकिस्तान जिंकू रे देवा, पण...; टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट 'शेजाऱ्यांच्या' हाती, पाहा गणित
19
बनावट नोटा बनवण्याची ट्रिक सांगून तरुणाला घातला ५.५ लाखांचा गंडा; काय आहे हे प्रकरण?
20
Hyundai Motor IPO मध्ये 'हे' गुंतवणूकदार आजपासून करू शकतात गुंतवणूक, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक आपटला

दिल्लीतील संमेलनाला ५ हजार मराठी रसिक येणार! यंदाच्या परिसंवादात 'हे' विषय ऐकायला मिळणार

By श्रीकिशन काळे | Published: October 13, 2024 5:54 PM

रसिकांना संमेलनात काही त्रास होणार नाही, याबाबत संयोजकांकडून विशेष काळजी घेतली जाणार

पुणे : दिल्लीमध्ये आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यासाठी देशभरातून आणि महाराष्ट्रातून सुमारे पाच हजार रसिक येण्याचा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे. संमेलनासाठी तालकटोरा इनडोअर स्टेडिअम स्थळ निश्चित केले असून, दिल्लीमध्ये रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम असणार नाही, त्या दृष्टिकोनातून या संमेलनाचे नियोजन होणार आहे.

मराठी भाषिकांसाठी दिल्ली येथे होणारे संमेलन गौरवशाली असणार आहे. दरवर्षी संमेलनामध्ये विविध परिसंवाद होत असतात. एकावेळी तीन ते चार मंडपांमध्ये कार्यक्रम होत असतात. ग्रंथप्रदर्शनासाठी स्वतंत्र मांडव टाकलेला असतो. गेल्यावर्षी अमळनेरला संमेलन झाले. तेव्हा जवळपास सर्वच मांडवांमध्ये खूप अंतर होते. त्यामुळे रसिकांना एका मांडवातून दुसरीकडे जाण्यासाठी त्रास सहन करावा लागला. पण आता दिल्लीतील संमेलनात तसा त्रास होणार नाही. कारण दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअमच्या परिघातच संमेलनाचे सर्व मांडव उभे असणार आहेत.

दिल्लीमध्ये मराठी भाषिक लोक सुमारे पाच लाखांहून अधिक आहेत. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे आहेत. या संमेलनाला येणाऱ्यांची निवास व्यवस्था महाराष्ट्र सदन, इंडिया इंटरनॅशनल सेंटर, जैन भवन आदी ठिकाणे करण्याचे नियोजन होत आहे. त्यासाठी संयोजक सरहद संस्था प्रयत्न करत आहे. दिल्लीमध्ये अनेक मराठी सनदी अधिकारी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आहेत. त्यांच्यासह संमेलनाला एकूण पाच हजार रसिक येतील, अशी अपेक्षा आहे. नेहमीच्या संमेलनात रात्री उशिरापर्यंत रंगणारी कविसंमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रमही दिल्लीत होणार नाहीत. ते सायंकाळी संपविण्याचा प्रयत्न असणार आहे. संमेलनामध्ये बहुभाषिक आणि निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे.

परिसंवादाचे विषय !

देशाचे राजकारण आणि मराठी साहित्य, मराठी आणि महाराष्ट्र धर्म, लेखक राजकारण्यांशी मनमोकळा संवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता, बृहन्महाराष्ट्रातील साहित्यनिर्मिती आणि जीवन, मराठीचा अमराठी संसार, परिचर्चा-आनंदी गोपाळ या पुस्तकावर, अनुवादावर परिसंवाद, मधुरव हा विशेष कार्यक्रम असणार आहे.

टॅग्स :Puneपुणेakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळcultureसांस्कृतिकSocialसामाजिकartकलाEducationशिक्षणdelhiदिल्ली