शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

पुणे : पीएमपीएमएलचा ब्रेक फेल झाल्यानं 5 गाड्यांना बसली धडक, विचित्र अपघातात एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 12:50 PM

पुण्यामध्ये 5 वाहनांचा विचित्र अपघात घडला आहे. पीएमपीएमएलचा ब्रेक फेल झाल्यानं या बसची 5 वाहनांना धडक बसली.

पुणे - बिबवेवाडी (पुणे ) -  प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अतिक्रमणाने व्यापलेल्या अप्पर-अंबामाता रस्त्यावर भर चौकात पीएमटीचा ब्रेक निकामी झाल्याने 7 वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवारी (6 नोव्हेंबर) सकाळी ११.४५ वाजण्याच्या अप्पर डेपोमधून शिवाजीनगरकडे जाणा-या पीएमपीचा ( एमएच १४ सीडब्लू १७२३) ब्रेक निकामी झाला. या पीएमपीने कोल्ड्रिंकने भरलेल्या टेम्पोला जोरात धडक दिली. कोल्ड्रिंकचा हा टेम्पो दुस-या मालवाहतूक करणा-या  टेम्पोला जाऊन धडकला. यानंतर हा मालवाहतूक करणारा  टेम्पो सुखसागरनगरला जाणारी पीएमपीला (एमएच १२ एफसी ९४७) धडकला. 

या धडकेत दोन बाईक पीएमपीच्या खाली गेल्या व त्यातीलच एका बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झालेत. बिबवेवाडी पोलिसांनी तातडीने जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. क्रेनच्या सहाय्याने सर्व गाड्या बाजूला काढून पोलिसांनी रस्ता मोकळा करुन दिला. हा अपघात घडला त्याचवेळी मुक्तांगण शाळेची बसदेखील त्या ठिकाणी आली होती. मालवाहतूक टेम्पोचा पुढील भाग पीएमपीच्या आत अडकल्यामुळे या स्कूल बसला समोरच्या बाजूने जोराची धडक बसली. सुदैवानं बसमधील विद्यार्थांना काहीही झालेले नाही. या विचित्र अपघातामुळे शाळकरी मुलं घाबरली होती.  

या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना व मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना पीएमपी विभागाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नगरसेविका रुपाली धाडवे यांनी केली आहे. नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, दिनेश धाडवे, मनोज देशपांडे यांनी घटनास्थळाला तातडीने भेट दिली. हा अपघात होण्याचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेला हा पूल. तसेच येथील अतिक्रमणे. याविषयी 'लोकमत'ने वेळोवेळी आवाजदेखील उठवला होता. मात्र पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व येथील स्थानिक नेत्यांचा अधिका-यांवर नसलेल्या वचकामुळे येथील समस्या सोडवली जात नाही. त्याचा परिणाम म्हणून दररोज होणा-या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात