शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

मराठा चेंबर ऑफ कॉमर्सकडून जिल्ह्यासाठी ५० बायकँट यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:10 AM

पुणे : मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी ५० बायकँट यंत्रे भेट देण्यात आली. जो रूग्ण फारसा ...

पुणे : मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी ५० बायकँट यंत्रे भेट देण्यात आली. जो रूग्ण फारसा गंभीर नाही, पण त्याला व्हेंटिलेटर लागू शकतो, त्याच्यासाठी हे यंत्र काही काळ उपयोगी पडेल.

संस्थेचे महासंचालक प्रशांत गिरवणे यांनी ही यंत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शुक्रवारी सकाळी कौन्सिल हॉल आवारात सुपूर्त केली. विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद या वेळी उपस्थित होते.

ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांच्या सध्या असलेल्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर ही यंत्रे उपयुक्त आहेत, असे गिरवणे यांंनी सांगितले. पुणे शहरासह, पिंपरी चिंचवड महापालिकेलाही अशी यंत्र देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पवार यांनी यावेळी अनेक शंका विचारून निरसन करून घेतले. ग्रामीण भागात वीज जाते अशा वेळी यंत्र चालेल का, त्यात लिक्विड ऑक्सिजन भरावा लागतो का, अशी विचारणा त्यांनी केली. यंत्र हवेतील ऑक्सिजन खेचून घेते, वेगळा पुरवठा करावा लागत नाही, वीजपुरवठा खंडित झाला तरीही ते काम करते, अशी माहिती गिरवणे यांंनी त्यांना दिली.

आमदार सुनील टिंगरे यांची रूग्णवाहिका, उरुळी कांचन ग्रामपंचायतीची शववाहिका यांचेही लोकार्पण पवार यांच्या हस्ते झाले. नगरसेवक सचिन दोडके यांनी वारजे माळवाडीत केलेल्या आरोग्य सुविधांचे पवार यांनी ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण केले.