पिंपरी : आर्थिक वर्षात ३० जूनपूर्वी थकबाकीसह मालमत्ताकर एकरकमी भरल्यास मालमत्ताधारकांना सामान्य करात ५ ते १५ टक्क्यांपर्यंतची सवलत दिली जाणार आहे. महापालिकेचे सहआयुक्त दिलीप गावडे यांनी याबाबतची माहिती दिली. ३० जून १७ पूर्वी मालमत्ताकराची थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या संपूर्ण बिलाचा एकरकमी भरणा करणाऱ्यांना विविध सवलत योजनांपैकी एका योजनेचा लाभ घेता येईल. तसेच डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी ३० जून १७ अखेर कराचा आॅनलाइन भरणा केल्यास चालू वर्षाच्या सामान्य करात पाच टक्के सवलत आणि त्यापुढे ३१ मार्च २०१८ अखेर भरणा केल्यास चालू वर्षाच्या सामान्य करात दोन टक्के सवलत मिळणार आहे.शौर्यपदक विजेते, माजी सैनिकांच्या विधवा, शहीद सैनिक यांना मालमत्ताकरात १०० टक्के तर, महिलेच्या नावाने असलेल्या एका निवासी घराला ५० टक्क्यांपर्यंत मालमत्ताकरात सूट देण्यात आली आहे. माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांच्या पत्नी हे स्वत: राहत असलेल्या फक्त एक निवासी घर केवळ महिलेच्या नावे असलेल्या केवळ एक निवासी घर, अंध-अपंग, कर्णबधिर, मूकबधिर यांच्या नावे असलेल्या मालमत्तांच्या करात ५० टक्क्यांची सवलत मिळेल.(प्रतिनिधी)
महिलांना मालमत्ता करात ५०% सवलत
By admin | Published: April 25, 2017 4:13 AM