रेडणी : जिल्ह्यात सध्या १७ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोमाने सुरू आहे. यामध्ये ११ सहकारी व ६ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात ५ जानेवारीअखेर एकूण ४७ लाख ८४ हजार ३२ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ५० लाख १२ हजार ५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपात बारामती अॅग्रो साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. ५ जानेवारी अखेर या कारखान्याने ४ लाख ९३ हजार ३६५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, ५ लाख २० हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्मयोगी सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्याने ४,३५,९९० मे. टन उसाचे गाळप करून ४,३५,५०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. बारामती अॅग्रो साखर कारखान्याचा साखर उतारा १०.५५ टक्के असून, कर्मयोगी कारखान्याचा साखर उतारा ९.९९ टक्के इतका आहे. साखर उताऱ्यामध्ये सोमेश्वर कारखाना आघाडीवर आहे. त्यांनी ३ लाख ८३ हजार ४८० मेट्रिक टन गाळप करून ४ लाख २९ हजार २५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखर उतारा ११.१९ टक्के आहे.
जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांचे गाळप (मे. टन) व साखर उत्पादन (क्विंटलमध्ये)माळेगाव : (२,६१,००० / २,७९,२००), छत्रपती : (२,९३,४८७/२,७८,१००), भीमा- पाटस :(१,८३,५२०/ १,६२,५७५), विघ्नहर : (३,७९,५८०/ ४,१३,३००), राजगड : (७३,७४५/६७,४००), संत तुकाराम : (२,१८,९१०/ २,२५,२२५), घोडगंगा : (२,९३,०६०/ ३,११,०५०), भीमाशंकर : (२,९२,८३०/ ३,१६,७००), नीरा-भीमा : (२,६८,१९०/ २,७४,३७०), श्रीनाथ म्हस्कोबा : (२,२९,६७५/ २,४१,८१५), अनुराज शुगर्स-(२,०४,७४०/ २,१८,६००), दौंड शुगर : (४,१२,२२०/४,५४,४५०), व्यंकटेश कृपा शुगर : (२,४२,३५४/ २,५८,५८०),पराग अॅग्रो : (१,१७,८८६/१,२५,६३५).