पुणे - आॅनलाइन खरेदी-विक्री करणाºया संकेतस्थळावर श्वान विकायचे असल्याची जाहिरात देऊन नागरिकांना गंडा घालणाºया २१ वर्षीय युवकास सायबर गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केले. त्याने शहरातील सात ते आठ नागरिकांसह तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात येथील पन्नासहून अधिक व्यक्तींना अशा प्रकारे गंडा घातल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.राजन जनार्दन शर्मा (वय २१, सध्या रा. औंध, मूळ राहणार पश्चिम बंगाल) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी नौदलात कार्यरत असणाºया एका व्यक्तीने फिर्याद दिली. त्याला त्याच्या पत्नीला चांगल्या जातीचे श्वान भेट द्यायचे होते. त्यासाठी तो इंटरनेटवर विक्रेत्याचा शोध घेत होता. एका आॅनलाइन खरेदी-विक्री करणाºया संकेतस्थळावर तसे श्वान त्यांना आढळून आले. संबंधित जाहिरातीत नमूद मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांनी ८ हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. पैसे जमा केल्यानंतर श्वान पार्सलद्वारे घरी पाठविण्यात येईल, असे फिर्यादीला सांगण्यात आले होते. मात्र, पैसे भरल्यानंतरही श्वान न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.सायबर पोलिसांनी संबंधित जाहिरातीतील मोबाईल क्रमांक, आॅनलाइन खरेदी-विक्री करणाºया संकेतस्थळाकडून मिळालेली माहिती आणि बँक खात्यावरून आरोपीचा माग काढला. शर्मा याच्याकडून २ मोबाईल, एक लॅपटॉप, पाच सिमकार्ड व २ डेबिट कार्ड जप्त करण्यात आले.या प्रकरणी कोंढव्यासहयेरवडा आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याने शहरातील सात ते आठ जणांना दीड लाख रुपयांना फसविले असल्याची माहिती समोर आलीआहे.याशिवाय तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात आणि केरळ येथील सुमारे ४० व्यक्तींना त्याने गंडा घातला आहे.फसले गेल्याने स्वत:च सुरू केला फसविण्याचा उद्योगश्वान देण्याच्या बहाण्याने फसविला गेल्याने आपणही असा उद्योग सुरू केल्याचे संशयित आरोपी राजन जनार्दन शर्मा याने पोलिसांना सांगितले. गेल्या तीन महिन्यांपासून तो पुण्यात वास्तव्यास असून, त्याच्या बँक खात्यात या काळात सात ते आठ लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी दिली.
आॅनलाइन श्वान विकण्याच्या बहाण्याने ५० जणांना गंडा, युवक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 3:22 AM