शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

मसाप निवडणुकीसाठी ५० टक्के मतदान

By admin | Published: March 13, 2016 1:48 AM

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारपर्यंत सुमारे ५,४८९ सभासदांनी मतदान केले. दि. १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत ११,३३६ मतदारांपैकी

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारपर्यंत सुमारे ५,४८९ सभासदांनी मतदान केले. दि. १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत ११,३३६ मतदारांपैकी अर्ध्याअधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बारकोड आणि ओळखपत्र या निकषांवर पात्र मतदार ठरविण्यात येणार असून, १५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अधिकृत निकाल जाहीर केले जातील, अशी माहिती या निवडणुकीचे मुख्य अधिकारी अ‍ॅड. प्रताप परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवारी (दि. १४) सायंकाळी ७ वाजेपर्यंत मसापच्या कार्यालयात मतपत्रिका स्वीकारण्यात येणार आहेत. दि. १५ रोजी सकाळी ९ वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. सायंकाळी ६ वाजेपर्यंत अधिकृत निकाल जाहीर करण्यात येईल. शनिवारपर्यंत पुणे शहरातील २,९४८ मतदारांपैकी १,०६०, तर पुणे जिल्ह्यातील १,५९६ मतदारांपैकी ८७३ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्र साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक सुरुवातीपासूनच दुबार नावे, बोगस मतदान, मृत व्यक्तींची नावे अशा विविध कारणांनी चर्चेत राहिली आहे. प्रारंभीचे काही दिवस थंड प्रतिसाद मिळाल्यानंतर सभासदांचा मतदानाचा ओघ हळूहळू वाढला. काही सभासदांना मतपत्रिका न मिळाल्याने त्यांनी दुबार मतपत्रिकांसाठी अर्ज केला होता. अर्ज केलेल्या ४१० पैकी ३५३ पात्र मतदारांना दुबार मतपत्रिका देण्यात आल्याचे परदेशी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मृत व्यक्तींच्या नावे अथवा बोगस मतदानाचे प्रमाण नगण्य असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. निवडणुकीसाठी परदेशी यांच्यासह अ‍ॅड. सुभाष किवडे, प्रा. सुधाकर जाधवर यांनी काम पाहिले. ठाणे, अहमदनगर, नाशिक, सांगली, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये निवडणूक बिनविरोध पार पडली. पुणे शहर, पुणे जिल्हा, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, कोकण या विभागांमध्ये मतदान प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी बारकोड पद्धती, ओळखपत्राची सक्ती, या पद्धतीने राबविल्याने मतदारांनी समाधान व्यक्त केले. >प्रथमच बारकोडमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रथमच बारकोड पद्धत वापरण्यात आली आहे. मतमोजणीदरम्यान सुरुवातीला बारकोड मॅच करणे आणि ओळखपत्रे तपासणे या निकषांवर पडताळणी होणार आहे.सुरुवातीचा तास-दीड तास ही पडताळणी झाल्यानंतर पात्र मतपत्रिकांच्या प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात होईल. ओळखपत्र नसलेल्या, मृत व्यक्तींच्या नावाने आलेल्या तसेच चारही बाजूंनी चिकटपट्टी लावलेल्या मतपत्रिका बाद ठरविल्या जाणार आहेत. त्यामुळे बोगस मतदानाचे प्रमाण नगण्य असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मतपत्रिकांबाबत आतापर्यंत झालेले घोळ लक्षात आणून दिले असता, इतक्या वर्षांच्या सवयी कशा बदलणार, असा सवाल करून त्यांनी कोपरखळी मारली.बोगस मतदानाला आळा घातला जावा, यासाठी मतदान प्रक्रिया आणखी पारदर्शी करण्याकडे लक्ष देण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. डॉ. न. म. जोशी यांच्या नावाने बोगस मतदान झाल्याने मसाप निवडणूक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली असताना याबाबतची अधिक माहिती निकालादिवशी देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.