या शिबीराचे पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव चव्हाण यांनी शुभारंभ केला. या वेळी पुरंदर पंचायत समितीचे उपभापती गोरखनाथ माने, दत्ताजी चव्हाण, बाळासाहेब ननावरे, अल्ताप सय्यद, राजेश काकडे, राजेश चव्हाण, अनिल चव्हाण, पृथ्वीराज काकडे, गणेश दरेकर, उमेश चव्हाण, किरण जेधे, दयानंद चव्हाण, मिलिंद भोसले, प्रकाश शिंदे कमेश जावळे, राजू देसाई इत्यादी उपस्थित होते.
पुना सिरॅलॉजीकल इन्स्टिट्युट ब्लड बँकेच्यावतीने रिंकू शेंडगे, आकांक्षा आहेर, प्रियंका तुतारे, मंगेश जाधव अनिश शेख, राहुल कुडेकर, उद्धव चौधरी यांनी रक्त संकलित करण्याचे काम केले. रक्तदान करणाऱ्यांना पदक व प्रमाणपत्र देण्यात आले.
दत्ताजी चव्हाण म्हणाले, राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. एका व्यक्तीने दिलेल्या रक्तामुळे १० जणांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे तरुणांनी शिबिरे आयोजित करून रक्तदान करणे गरजेचे आहे.