अजित पवारांसाठी 500 किलोंचा हार; बारामतीत हटके 'शक्ति'प्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 11:18 AM2019-10-04T11:18:04+5:302019-10-04T11:19:22+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने बारामती विधानसभा नेहमीच राज्यात लक्षवेधी ठरतो..
बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघ निवडणुुकीचा प्रचार सुरु होण्यापुर्वीच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे चर्चेत आला आहे. शुक्रवारी ( दि. ४ ) आज अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.तत्पुर्वी पवार यांची शहरातुन मिरवणुक काढण्यात येणार आहे.यावेळी पवार यांच्या स्वागतासाठी समर्थक नगरसेवक सत्यव्रत काळे यांनी चक्क ५०० किलोचा पुष्पहार तयार केला आहे.त्यासाठी तयार केलेला हार घेवुन भिगवण चौकात थांबलेली क्रेन बारामतीकरांचे लक्ष वेधुन घेत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने बारामती विधानसभा नेहमीच राज्यात लक्षवेधी ठरतो.राज्यात सर्वाधिक चर्चा याच मतदारसंघाची होते.आजपासुन ही चर्चा अधिक रंगणार आहे.आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पवार यांच्यासह भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.आजपासुन दोन्ही नेत्यांच्या प्रचाराचा शुभारंभ देखील होणार आहे.त्यासाठी दोन्ही पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरु आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी पवार यांची मिरवणुक काढण्यात येईल.यावेळी त्यांच्या स्वागतासाठी नगरसेवक काळे यांनी ५०० किलोचा हार तयार केला आहे.भिगवण चौक येथे क्रेनच्या सहाय्याने पवार यांंना हा हार घालुन त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. बारामती गणेश मंडईतील सतीश काळे यांनी ५०० हुन अधिक वजनाच्या फुलांचा हा हार बनविला आहे.