विधानसभा निवडणुकीसाठी पुणे, पिंपरी व जिल्ह्यात तब्बल १३ हजार पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष बंदोबस्त राहणार आहे. ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत साडेपाच कोटींची रोकड जप्त केली आहे.पकडलीपुणे : विधानसभा निवडणुकांसाठी जिल्ह्यात मतदान प्रक्रियेसाठी तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत साडेपाच कोटींची रोकड जप्त केली असून, ६ हजार लिटर बेकायदा दारू, एक लाख लिटर रसायन जप्त केल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिली. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये ३ हजार ४५० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या प्रत्येक केंद्रावर एक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील असे एकही मतदान केंद्र निष्पन्न झालेले नाही. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार संवेदनशील ठरवल्या गेलेल्या ८३ संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त देण्यात आला आहे. तसेच याठिकाणी अतिरिक्त गस्ती पथके तैनात करण्यात येणार असल्याचे लोहिया यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडावी याकरिता पोलिसांचे प्रयत्न सुरूआहेत. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस सक्षम असून, निवडणूक शांततेत पार पडेल, असा विश्वास लोहिया यांनी व्यक्त केला आहे.(प्रतिनिधी)
जिल्ह्यात साडेपाच कोटी जप्त : ६ हजार लिटर दारूही
By admin | Published: October 11, 2014 6:48 AM