चिखले यांचे कळंब येथील युको बँकेत बचत खाते आहे. त्यांनी २५ ऑगस्ट रोजी मंचर येथील एमएफडीसी बँकेचे एटीएममधून तीन हजार रुपये काढले होते. त्यावेळी त्यांच्या खात्यावर ५९ हजार ९८६ रुपये शिल्लक होते. त्यानंतर त्यांनी त्यांचे एटीएमकार्ड घरामध्ये ठेवले होते. शनिवार दि.४ रोजी त्यांना घरगुती कामासाठी पैशाची गरज पडल्याने त्यांनी कळंब येथील युको बँकेच्या एटीएम मधून तीन हजार २०० रुपये काढले. तेव्हा फिर्यादीने मोबाईलवर संदेश आलेला पाहिला असता त्यांच्या खात्यात केवळ सहा हजार ७६३ रुपये शिल्लक असल्याचा संदेश होता. त्यांच्या खात्यावरती एकूण ५६ हजार ७८६ रुपये इतकी रक्कम शिल्लक रहाणे अपेक्षित होते. खात्यावर फक्त सहा हजार ७६३ रुपये शिलक राहिले असल्याने त्यांनी याबाबत युको बँक शाखा कऴंब येथे चौकशी केली. बँक अधिकारी यांनी खात्यातून एटीएमव्दारे एकूण 50 हजार रुपये काढण्यात आले असल्याचे सांगितले. व त्या संदर्भात स्टेटमेंट दिले. एटीएममधून पाच वेळा प्रत्येकी दहा हजार रुपये अज्ञात व्यक्तीने काढून घेतले आहेत. याबाबत खात्यावरील पैसे काढून फसवणूक केली असल्याचे लक्षात येताच चिखले यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
एटीएमद्वारे महिलेच्या खात्यातील अज्ञाताने काढले ५० हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:16 AM