आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील श्री पंढरीनाथ महाविद्यालय हे १९८५ पासून तालुक्याच्या पश्चिम भागात शिक्षणाचे कार्य करत आहे. सुरुवातीला ८ ते १० वी पासून सुरू झालेल्या या महााविद्यालयात सध्या ५ पासून १२ वीचे वर्ग सुरू आहेत. नुकतेच या शैक्षणिक संस्थेस वरिष्ठ महाविद्यालय चालविण्यासाठी शासनाची परवानगी मिळाली असून बी.ए.,बी.कॉम व बी.एस्सी.चे वर्गही सुरू झाले आहेत. सध्या येथे महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. कोणताही भक्कम आर्थिक मदतीचा पर्याय समोर नसताना वर्गणी, देणगी तसेच समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने संस्थेने हे काम अतिशय संयामाने व धैर्याने पुढे सुरू ठेवले आहे. वेळ प्रसंगी उसनवारी करूनही या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाला येणाऱ्या खर्चाला हातभार लागावा या भावनेतून डॉ. साबळे यांनी मदत केली आहे.
पंढरीनाथ महाविद्यालयास ५१ हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:13 AM