शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

‘भीमा-पाटस’ला ५२ अर्ज अवैध

By admin | Published: April 28, 2015 11:30 PM

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ३३0 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

दौंड : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ३३0 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दरम्यान, छाननीअंतर्गत ५२ अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी दिली. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या नियमानुसार २८-२ या कलमाच्या आधारे पिकवलेला संपूर्ण ऊस निवडणूकपूर्वीच्या पाच गळीत हंगामांपैकी लगतच्या सलग ३ हंगामांत कारखान्याला घालण्याचे बंधन ज्यांनी पाळले नाही, अशा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे. उमेदवारी अर्जांची छाननी सोमवारी होती; परंतु ६२ अर्जांवर हरकती घेतल्यामुळे छाननी आणि निर्णय देण्यास विलंब झाला. दरम्यान, हरकत घेतलेल्या अर्जांवर मंगळवारी दुपारी सुनावणी झाली. यात मान्यवरांचे अर्ज बाद झाले आहेत. (वार्ताहर)मान्यवरांचे अर्ज बाद४भीमा-पाटस कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आमदार राहुल कुल गटाच्या विरोधात सर्वपक्षीय एकत्रित पॅनल करण्याच्या हालचालींना सुरुवात झाली. परंतु या पॅनलचे प्रमुख आणि भीमा-पाटसचे माजी उपाध्यक्ष सत्त्वशील शितोळे यांचाच अर्ज बाद केल्यामुळे भीमा-पाटसच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाराजीचा सूर होता. ४दौंड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पोपटराव ताकवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब ढमढेरे, माजी पंचायत समिती सदस्य दौलत ठोंबरे, माजी पंचायत समिती सदस्य बबन रणवरे, पाटसचे माजी सरपंच योगेंद्र शितोळे, माणिकराव भागवत, शहाजी चव्हाण, नारायण आटोळे, शहाजी अवचर, नानासाहेब जेधे, अशोक खळदकर, वरवंडचे माजी सरपंच रामदास दिवेकर, सुभाष बोत्रे, विठ्ठल थोरात यांच्यासह मान्यवरांचे अर्ज अवैध झालेले आहेत. ४विरोधकांचे राजकीय दबावापोटी जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणावर अर्ज बाद करण्यात आला असल्याचा आरोप भीमा-पाटसचे माजी उपाध्यक्ष सत्त्वशील शितोळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ४दरम्यान, या निकालाच्या विरोधात साखर सहसंचालकाकडे तक्रार करण्यात येणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांनी निवडणुकीला घाबरून विरोधकांचे अर्ज रद्द करण्याचे षड्यंत्र रचले असल्याचे स्पष्ट करून शितोळे म्हणाले की, सभासदांना भाव नाही तर कामगारांना पगार नाही, अशा दुहेरी कचाट्यात राहुल कुल अडकलेले असून, निवडणुकीत जनता त्यांच्या बाजूने कौल देईल की नाही याबाबत त्यांना साशंकता आहे. त्यामुळे कुल यांनी राजकीय वापर करून विरोधकांचे अर्ज बाद केले. वास्तविक पाहता मी कारखान्याला सलग तीन वर्षे ऊस दिला आहे. ४यासंदर्भातील दाखला कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी मला दिलेला आहे. गट क्र. ५४ वरून माझ्या अर्जावर हरकत घेण्यात आली. त्या गटात चुकीच्या पद्धतीने गुऱ्हाळ दाखविण्यात आले आहे. ही चूक मी कारखाना व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर या गटातील ऊस चाऱ्यासाठी दिल्याच्या कारणावरून माझा अर्ज बाद केला आहे. तेव्हा कारखान्याने एफआरपी दिलेली नाही. यासंदर्भात लवकरच भीमा पाटसवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे.