बारामती : राज्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली असली तरीही बारामती उपविभागामध्ये अद्यापही टँकरच्या पाण्यावरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. राज्यभर बरसणारा वरुणराजा बारामती उपविभागावर मात्र रुसला असल्याचे चित्र आहे. बारामती, इंदापूर तालुक्यात सध्या ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. बारामती तालुक्यातील २२ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या २५५ वाड्यावस्त्यांतील ७० हजार ४२२ लोकसंख्येला टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. इंदापूर तालुक्यातील २१ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या १०७ वाड्यावस्त्यांतील ८१ हजार ७४ एवढ्या लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बारामती तालुक्यातील बाबुर्डी, काळखैरेवाडी, देऊळगाव रसाळ, जळगाव सुपे, पानसरेवाडी, कारखेल, जराडवाडी, खराडेवाडी, कोळोली, उंडवडी सुपे, उंडवडी क.प., मोराळवाडी, वाकी, कुतवळवाडी, दंडवाडी, कटफळ, सोनवडी सुपे, गोजुबावी, भोंडवेवाडी, आंबी खुर्द, नारोळी, अंजनगाव, भिलारवाडी, वाढाणे, तरडोली, मासाळवाडी, लोणी भापकर, शिर्सुफळ, काऱ्हाटी, मुर्टी, मुढाळे, गाडीखेल, मोढवे, मोरगाव, पारवडी, जैनकवाडी, सावळ या गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या २५५ वाड्यावस्त्यांना ३३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. इंदापूर तालुक्यातील कळंब, वडापुरी, गलांडवाडी-२, विठ्ठलवाडी, गोखळी, झगडेवाडी, खोरोची, वकीलवस्ती, भोडणी, कौटळी, शेटफळगढे, रुई, कळस, व्याहाळी, घोरपडवाडी, कचरवाडी, निमगाव केतकी, कडबनवाडी, अकोले, नीरनिमगाव, काटी, लामजेवाडी, भादलवाडी, पिटकेश्वर या गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या १०७ वाड्यावस्त्यांना १९ पाणीपुरवठा सुरू आहे. (वार्ताहर)
५२ टँकरने पाणीपुरवठा
By admin | Published: July 14, 2016 12:42 AM