भाजीपाला, हातगाडीविक्रेते आणि व्यावसायिक, दुकानदारांच्या तपासण्यासाठी मोहिमेला वेग दिला आहे. चाकण येथे २३४ पैकी ४२ जण कोरोनाबाधित तर आळंदी येथे २६६ पैकी १३ असे एकूण ५५ कोरोनाबाधित रुग्ण एकाच दिवशी सापडल्याने नागरिकांचे धाबे दणाणले आहे. ५५ पैकी ४३ रुग्णांना म्हाडा कोविड सेंटरला तर १२ रुग्णांना खासगीत दाखल करण्यात आल्याची माहिती प्रांत विक्रांत चव्हाण यांनी दिली. या आरोग्य तपासणी मोहिमेतून सुपर स्प्रेडर ओळखले जाणारे व्यावसायिकाच्या चाचणीतून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासनाला यश येत असले तरी नागरिकांची बेफिकीरीपणा मात्र त्यांच्या कुटुंबीयातील ज्येष्ठ नागरिकांचे बाधित प्रमाण वाढत असून संपूर्ण कुटुंबातील सदस्य बाधित होण्याची संख्या जास्त आहे.
विक्रेत्यांच्या अँटिजेन टेस्टमधून ५५ जण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 4:11 AM