पुणे : गेल्या आठवड्यात घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील रस्ते आणि लहान मोठे पुल मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात तब्बल 260 किलो मीटरचे रस्ते व 190 पुलांना पुराचा फटका बसला असून, तब्बल 55 कोटी 49 लाख रुपयांचा निधी दुरुस्तीसाठी लागणार असल्याचा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात गुरुवार व शुक्रवार दोन दिवसांत पावसाने अशरक्षः थैमान घातले. जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा अदी तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. शेतीसह सार्वजनिक मालमत्तेचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या तालुक्यात काही ठिकाणी पुल पाण्याखाली गेले तर काही ठिकाणचे रस्ते बंद झाले. नदीनाले, ओढ्यांना महापूर आल्याने रस्ते, पुल, मो-या वाहून गेल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक फटका भोर तालुक्यातील रस्ते व पुलांना बसला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने प्राथमिक अहवाल तयार केला असून, यात तब्बल 260 किलोमीटरचे रस्ते व 190 पुलांचे नुकसान झाले आहे. यात तात्पुरत्या दुरूस्तीसाठी तातडीने साडे सात कोटी तर कायमस्वरूपी दुरूस्तीसाठी 48 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. -------जिल्ह्यातील रस्ते व पुलांचे मोठे नुकसान गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा अदी तालुक्यांमध्ये रस्ते व पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये काही कामे तातडीने पूर्ण करावी लागणार आहेत. तर पाऊस थांबल्यानंतर कायमस्वरुपी दुरूस्ती करावी लागणार आहे. - अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता ,सार्वजनिक बांधकाम विभाग ---------तालुकानिहाय रस्ते व पुलांचे नुकसान तालुका रस्ते (कि.मी) पुल मुळशी 29.76 47भोर 117.85 33वेल्हा 34.47 16जुन्नर 27.32 35आंबेगाव 24 31मावळ 18.35 16खेड 8. 2 12 एकूण 260.25 190