पुणे : घरात, दुकानावर दरोडा पडला, रस्त्यावरून जाताना चोरट्याने जबरदस्तीने गळ्यातील सौभाग्य लेणे हिसकावून नेले़ अशा चोरट्यांना पोलिसांनी पकडले़ पण, त्यांच्यावरील खटले रेंगाळलेले असल्याने हा लोकांचा बहुमोल्य ऐवज पोलिसांच्या कस्टडीत खिचपत पडलेला़ पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी त्यामागील भावना लक्षात घेऊन पोलिसांनी जप्त केलेला ऐवज परत देण्याची मोहीम राबविली़ त्यातून गेल्या २ वर्षांत तब्बल ५८८ कुटुंबीयांच्या चेहºयावर हास्य फुलविण्यात पोलिसांना यश आले आहे़ या काळात २७ किलो ५६० ग्रॅम सोन्याचे आणि १९ किलो ४१४ गॅ्रम चांदीचे दागिने, वस्तू असा ७ कोटी २४ लाख १४ हजार ७८ रुपयांचा ऐवज नागरिकांना समारंभपूर्वक परत करण्यात आला़ रस्त्यावरून जाणाºया महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्याचे प्रकार सर्रास घडतात़ अशा चोरट्यांना पकडलेही जाते़ पण, त्यांनी चोरलेल्यापैकी काही दागिने जप्त केले जातात़ आता आपले सौभाग्याचे लेणे पोलिसांनी जप्त केले असले तरी ते आपल्यापर्यंत कधी पोहचेल, याची काळजी या महिलेला असते़ मंगळसूत्रासारखा दागिना यात तिच्या भावभावना गुंतलेल्या असतात़ घरातील ऐवज हे अनेकांच्या वाडवडिलांच्या आठवणीचे संचित असते़ तेच चोरट्यांनी लुटून नेल्याने त्याच्या किमतीपेक्षा त्यात गुंतलेल्या भावना त्यांच्यासाठी अधिक असतात़ लोकांच्या या भावना लक्षात घेऊन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी जप्त केलेला मुद्देमाल लवकरात लवकर तक्रारदारांकडे कसे सुर्पूत करता येईल, यादृष्टीने सर्व पोलिसांना त्यासाठी आवश्यक ती पूर्तता करण्यासाठी एक मोहीमच हाती घेतली़ त्यानुसार ११ मे २०१६ रोजी ७३ जणांना समारंभपूर्वक ७८ लाख ३२ हजार ३२७ रुपयांचा ऐवज परत करण्यात आला़ रविवार पेठेतील सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून चोरट्यांनी ७०० ग्रॅम सोन्याची बिस्किटे चोरली होती़ पोलिसांनी त्यांना १२ तासांत अटक केली़ त्यांच्याकडून जप्त केलेला ऐवज महिन्याभरातच मूळ मालक मनोज जैन यांना परत करण्यात आला़ अशाच पद्धतीने अनेक महिलांना त्यांचे सौभाग्य लेणे परत करण्यात आल्याने पुणे पोलिसांविषयी त्यांच्या मनात असलेली प्रतिमा उंचावली आहे़
1रश्मी शुक्ला यांनी एप्रिल २०१६ मध्ये पुणे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर या विषयात लक्ष घातले व गुन्हेगारांकडून जप्त केलेला ऐवज त्या त्या तक्रारदारांना परत करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया तातडीने करण्याच्या सूचना दिल्या़2त्यातून मग ११ मे २०१६ मध्ये ७३ तक्रारदारांना समारंभपूर्वक ७८ लाख ३१ हजार ३१७ रुपयांचा ५ किलो ७७३ ग्रॅमसोन्याचे दागिने परत करण्यात आले़ त्यातील अनेकांनी तर आता दागिने परत मिळतील, याची आशाच सोडून दिली होती़3 लक्ष्मीनारायण चिवडा या दुकानात नोकराने चोरी केली होती़ पोलिसांनी १२ तासांत चोरट्याला सर्व ऐवजासह पकडले़ त्यानंतर महिन्याभरातच सर्व न्यायालयीन सोपस्कार पार पाडून मार्च २०१८ मध्ये त्यांचा ऐवज परत करण्यात आला़ त्यावेळी दर्पण डाटा म्हणाले, चोरट्याने चोरलेल्या दागिन्यांमध्ये आमच्या आईच्या भावना गुंतल्या होत्या़ हे दागिने परत मिळाल्याने तिला जो आंनद झाला तो शब्दांत व्यक्त करता येत नाही़