पुणे : शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी उचललेल्या पावलांबरोबरच गुन्हेगारांना बेकायदा शस्त्रे मिळू नयेत, यासाठी पोलिसांचा प्रयत्न असतो. गेल्या १० महिन्यात शहर पोलिसांनी बेकादेशीरपणे शस्त्र बाळगल्याबद्दल ५२ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ५९ गावठी पिस्तुल, रिव्हॉल्व्हर, कट्टे आणि १०८ काडतुसे जप्त केली आहे.
या वर्षी आतापर्यंत ४१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.गेल्या एका महिन्यात बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्या ९ जणांवर कारवाई करुन त्यांच्या कडून ९ गावठी पिस्तुल, रिव्हॉल्व्हर, कटे व १५ जिवंत काडतुसे असा ४ लाख ४४ हजार १०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक पंधरकर व त्यांच्या पथकाला खराडी येथे दोघे जण पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी समाधन लिंगप्प विभुते (वय २८, रा. वाघोली), गोपाल रमेश मुजमुले (वय २१, रा. खांदवेनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत २ गावठी पिस्तुले, एक गावठी कट्टा ६ जिवंत काडतुसे असा १ लाख ३६ हजार २०० रुपयांचा माल जप्त केला आहे.