शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
3
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
4
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
5
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
6
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
7
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
8
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
9
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
10
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
11
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
12
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
13
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
14
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
15
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
16
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
17
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
18
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
19
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
20
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान

पुणे जिल्ह्यातील ६ कारखान्यांची धुराडी झाली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 2:43 AM

जिल्ह्यातील १६ कारखान्यांपैकी ६ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. सर्व कारखान्यांनी मिळून १ कोटी ६ लाख मे.टन उसाचे गाळप करून, १ कोटी १९ लाख क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.

सोमेश्वरनगर  - जिल्ह्यातील १६ कारखान्यांपैकी ६ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. सर्व कारखान्यांनी मिळून १ कोटी ६ लाख मे.टन उसाचे गाळप करून, १ कोटी १९ लाख क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. तर, ११.९५चा सरासरी साखर उतारा ठेवत सोमेश्वर कारखान्याने साखर उताऱ्यात बाजी मारली आहे.यावर्षी जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांपेक्षा ऊसगाळपात खासगी कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी साखर कारखान्यांना पुरेसा ऊस उपलब्ध नसल्याचे चित्र होते. मात्र, उसाचे जादा टनेज बसू लागल्याने कारखान्यांनी ऊसगाळपास विलंब होत आहे. त्यातच राज्यातील साखर कारखाने १ नोव्हेंबरला सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिल्याने आणि कारखान्यांनी गेटकेन उसावर जादा भर दिल्याने सभासदांचे ऊस अजून शेतातच उभे आहेत.सर्व कारखाने बंद होण्यासाठी ऊस उत्पादकांना एक ते दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यातील भीमा पाटस, कर्मयोगी, नीरा भीमा, दौंड शुगर, व्यंकटेशकृपा आणि अनुराज शुगर या कारखान्यांनी आपल्या हंगामाची सांगता केली आहे. तर, उर्वरितअकरा कारखान्याने आपापल्या कार्यक्षेत्रातील ऊस संपविण्यासाठी सुरू आहेत.यावर्षी ऊसउत्पादकांचे उसाचे पीक उशिरा तुटल्याने गहू अथवा इतर तत्सम पिके शेतकºयांना घेता आली नाहीत. त्यामुळे टनेज घटून ऊसउत्पादाकांना अर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. अडसाली ऊस संपविण्यासाठी कारखान्यांना फेबु्रवारी महिना उजाडला. त्यामुळे हंगाम संपविण्यासाठी साखर कारखान्यांना अजून एक ते दिड महिन्यांचा कालावधी लागण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे हंगाम सुरू होताना साखरेला चांगले दर होते. मात्र, आता साखरेचे दर पडल्यामुळे बँकांनी साखरेचे मूल्यांकन कमी केले आहे. त्यामुळे एफआरपीसाठी कारखान्यांना पैशांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.साखर उताºयात ‘सोमेश्वर’ची बाजी४जिल्ह्यातील सर्वच कारखाने साखर उताºयातअजून साडेअकराच्या आतच घुटमळट आहेत. अनेक साखर कारखान्यांचे ‘डे’ चे साखर बारा वर गेले आहे. मात्र, या हंगामात थंडीचे प्रमाण चांगले असूनही म्हणावा तेवढा साखर कारखान्यांना साखर उतारा मिळत नाही.सोमेश्वर कारखाना ११.९५ टक्के साखर उतारा मिळवित जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. कर्मयोगी कारखान्याने १० लाख ११ हजार मे. टन उसाचे गाळप करून १० लाख ८७ क्विंटल पोत्यांचे उत्पादन घेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. बारामती अ‍ॅग्रो कारखान्याने १० लाख १९ हजार ६२५ मे. टन उसाचे गाळप करून ११ लाख ७१ हजार ४०० पोत्यांचे उत्पादन घेत दूसरा क्रमांक पटकाविलासोमेश्वर कारखाना :९ लाख ७ हजार ८१५ मे. टन उसाचे गाळप करून १० लाख ७७ हजार ६५० पोत्यांचे उत्पादन घेत तिसºया क्रमांकावर आहे.साखर उतारासोमेश्वर कारखाना११.९५दौंड शुगर११.९१माळेगाव कारखाना११.९०

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPuneपुणे