लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शहरात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बाबा चौकात दूध ओतण्यात आले. या प्रकरणी नरुटवाडी येथील सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देऊन सोडले.संपाच्या समर्थनार्थ काटी व लाखेवाडी ही गावे ग्रामस्थांनी शंभर टक्के बंद ठेवली होती. बावड्याचा आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला होता. आज कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजार दिवस नसतो. त्यामुळे अडतीचे व्यवहार सुरु नव्हते. सोनाई दूध संघात दूध संकलन झाले नाही. सोनाई उद्योग समूहाने शेतकऱ्यांच्या मागणीला आज पाठिंबा दिला आहे. इंदापूरचा येत्या रविवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.सकाळी साडेदहा वाजता पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहरातील बाबा चौकात नरुटवाडीतील शेतकऱ्यांनी दूध ओतले. दूध ओतणाऱ्या ज्योतीराम भागवत कोकाटे (वय ३१), महेश दत्तु कोकाटे (वय २३ वर्षे), बापू धनाजी मारकड (वय २५), मयूर ज्ञानदेव बिचकुले (वय १९), अविनाश नागनाथ देवकर (वय २०), अक्षय युवराज मारकड (वय २०) यांना फौजदार अमोल ननवरे, पोलीस नाईक महेश माने, विनोद पवार यांनी बीपी अॅक्ट ६८ अन्वये ताब्यात घेतले.
दूध ओतल्याप्रकरणी ६ जणांना घेतले ताब्यात
By admin | Published: June 03, 2017 1:52 AM