पुणे : हडपसर परिसरातील सय्यद नगर भागात मिळालेल्या कोरोनाबाधित व्यक्तीनंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याच्या संशयावरुन शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास सहा व्यक्तींना नायडू रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी रात्री उशिरा दोन व्यक्तीना सोडण्यात आले. वानवडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सय्यदनगर भागातील सहा व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयानुसार वानवडी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी शुक्रवारी रात्री नायडू रुग्णालयात फोन करुन त्यांना घेऊन जाण्यासाठी सांगण्यात आले. त्यावेळी चाऊस यांनी स्वतः हजर राहून संशयित व्यक्तींना रुग्णवाहिकेत बसून दिले व रुग्णवाहिका नायडू रुग्णालयात पाठवली. शुक्रवारी रात्री उशिरा दोन व्यक्तीना सोडण्यात आले.यानंतर रामटेकडी झोपडपट्टीमधील लोक त्यावेळी सोबत होते हे समजल्यानंतर येथील लोकांना स्वतःची आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी सांगण्यात आल्यानंतर ते सर्व तपासणी साठी तयार झाल्याने त्यांना सुद्धा नायडू हॉस्पिटल ला पाठविण्यात आल्याची माहिती सलीम चाऊस यांनी दिली.या सर्व प्रकारानंतर सय्यदनगर व आजुबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी घराबाहेर न पडता काळजी घेण्याचे आवाहन वानवडी पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हडपसर येथील सय्यदनगरमधील ६ कोरोना संशयितांना केले नायडूत भरती; २ जणांना सोडले घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 8:47 PM
२ जणांना घरी सोडले; परिसरातील नागरिकांमध्ये भीती वाढली...
ठळक मुद्देवानवडी पोलिसांकडून नागरिकांनी घराबाहेर न पडता काळजी घेण्याचे आवाहन