पुणे : राज्यातील आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या संबंधित कंपनीला नियमबाह्य पद्धतीने टेंडर दिले आहे. स्वच्छतेच्या कामाचा अनुभव नसताना संबंधित कंपनीला नियमबाह्य पद्धतीने रुग्णवाहिका सेवा पुरवण्याचे कंत्राट दिले गेले. ६५ लाखाला यांनी घेतलेली रुग्णवाहीका प्रत्यक्षात 25 लाखाला आहे. आरोग्य मंत्रालय या घोटाळ्यात मुख्यलाभार्थी आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत या घोटाळ्याला जबाबदार आहेत. असा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा दयावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
रोहित पवार म्हणाले, राज्यात मार्केटच्या दरापेक्षा दुप्पट किमंतीने रूग्णवाहिकांची खरेदी केली आहे. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या संबंधित कंपनीला नियमबाह्य पद्धतीने टेंडर दिले आहे. यामध्ये सुमारे ६ हजार ५०० कोटींचा घोटाळा झाला आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत हाफकिन संस्था ओळखण्यात गल्लत करतात, पण पैसे खाण्यात गल्लत करत नाहीत .रुग्णवाहिका खरेदीसाठी दोनदा टेंडर काढण्यात आले. स्वच्छतेच्या कामाचा अनुभव नसताना संबंधित कंपनीला नियमबाह्य पद्धतीने रुग्णवाहिका सेवा पुरवण्याचे कंत्राट दिले गेले. तेव्हा, त्यांच्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या कंपनीला ही नाराज न करता त्यांना देखील टेंडरमध्ये सामावून घेण्यात आले. हा लढा माझ्या एकट्याचा नाही, जो कोणी या विरोधात कोर्टात जाईल त्यांना मी हे सगळे पुरावे देईल. आरोग्यमंत्री तानाजी सावंत आम्ही लढणारे आहोत पळून जाणारे नाही. पुढील 5 दिवसात तुम्ही सांगाल तेथे कागदपत्र घेऊन येतो. माझ्यासमोर येउन चर्चा करा. लहा बालक मृत्यूमुखी पडत आहेत आणि आरोग्य विभाग पैसे खाण्यात मग्न आहे. ह्या फाईल अर्थ मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे देखील गेल्या आहेत त्यांनी मंजुरी कशी दिली? निवडणुकांना यांच्याकडून निधी दिला जात आहे. हा सगळा दलालीचा प्रकार आहे. सरकारमध्ये आणि आरोग्य मंत्र्यामध्ये धमक असेल तर माझ्या समोर येऊन यावर चर्चा करावी. यामध्ये सत्तेतील एक मोठया नेत्याचा मुलगा यामध्ये सहभागी असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.
दोन दिवसात सातारा , माढाचा निर्णय होईल
लोकसभेच्या सातारा आणि माढा जागे बाबतचा निर्णय येत्या दोन दिवसात होईल. ब्रिटीशांनी जी वृत्ती वापरली तीच वृत्ती आता वापरली जात आहे. बारामती मध्ये एमआयडीसी, पुण्यात आयटी आणि धरणं माजी केद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यामुळे झाली. विकासापेक्षा विचार अधिक जास्त म्हत्वाचा आहे. भाजप नेते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे त्यांना फायदा होईल अशी भुमिका वंचित विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर घेणार नाहीत. त्यांनी वेगळी भुमिका घेतली तर ती कार्यकर्ते जनतेला पटणार नाही असे राेहित पवार यांनी सांगितले.