शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

मातेच्या कुशीतून पळवून नेत ६ वर्षीय बालिकेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:15 AM

पुणे : मातेच्या कुशीतून पळवून नेऊन सहा वर्षांच्या बालिकेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा पुणे स्टेशन परिसरातच घडला. ...

पुणे : मातेच्या कुशीतून पळवून नेऊन सहा वर्षांच्या बालिकेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा पुणे स्टेशन परिसरातच घडला. या प्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली आहे. सागर मारुती मांढरे (वय ३९, रा. दुगड चाळ, सच्चाईमाता मंदिरामागे, कात्रज) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. पीडित मुलीचे कुटुंब मालधक्का चौकाजवळील एका झोपडपट्टीत राहते. पीडित मुलगी आईवडिलांसोबत एसटी बस स्थानकासमोरील फुटपाथवर आईच्या कुशीत झोपली होती. मध्यरात्री एकच्या सुमारास मांढरेने जबरदस्तीने तिला उचलून रिक्षामध्ये नेले. रिक्षा सातारा रस्त्यावरील सिटीप्राईड थिएटरमागे असलेल्या सोमशंकर चेंबर्स या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

घरच्यांना जाग आल्यावर मुलगी सोबत नसल्याचे लक्षात आले. आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र मुलगी सापडली नाही. त्यांनी तातडीने बंडगार्डन पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दाखल केली. पोलिसांनीही नुकत्याच घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर घटनेचे गांभीर्य ओळखले. आसपासचा परिसर पिंजून काढत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेण्यास सुरुवात केली. फुटेजच्या आधारे पोलिसांना आरोपीची ऑटोरिक्षामधून (एमएच १२ सीएच ०७१५) आरोपी मांढरे मुलीला घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला मार्केटयार्ड परिसरात जेरबंद केले. यानंतर पिडीत मुलीला रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले.

सहा वर्षांची मुलगी रात्रीतून हरवल्याची तक्रार प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांची पथके मुलीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे, असे बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस

यशवंत गवारी यांनी सांगितले.