शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Maharashtra: वय पूर्ण होण्याआधीच मतदार नोंदणी, राज्यात ६० हजार जणांनी केला अर्ज

By नितीन चौधरी | Published: October 04, 2023 4:37 PM

राज्यात अशी सर्वाधिक मतदार नोंदणी करण्यात ठाणे जिल्हा आघाडीवर असून नागपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे...

पुणे : राज्यात ५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीपूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण न झालेल्या युवकांना आता आगाऊ मतदार नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा ६० हजार ७४८ जणांचे एक जानेवारीनंतर वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाणार आहे. राज्यात अशी सर्वाधिक मतदार नोंदणी करण्यात ठाणे जिल्हा आघाडीवर असून नागपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पुण्याचा क्रमांक आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार पडताळणीची मोहीम सुरू आहे. यात नवमतदारांच्या नोंदणीसह दुबार व मृत मतदारांची नावे वगळणे, तसेच नाव, पत्ता किंवा फोटोमधील बदल यावर कार्यवाही करण्यात येत आहे. यंदा प्रथमच पुढील वर्षी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना आतापासूनच आगाऊ मतदार नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यांनी आताच आगाऊ नोंदणी केल्यास पुढील वर्षातील चार त्रैमासिकांत त्यांच्या जन्मतारखेनुसार १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. यानुसार राज्यात आतापर्यंत ६० हजार ७४८ जणांनी आगाऊ मतदार नोंदणी केली आहे. सर्वाधिक ६ हजार ३७८ जणांनी ठाणे जिल्ह्यातून नोंदणी केली आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये ४ हजार ४११ तर त्या खालोखाल पुणे जिल्ह्यामध्ये ४ हजार ३६१ जणांनी अशी आगाऊ मतदार नोंदणी केली आहे. सर्वात कमी २७७ जणांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आगाऊ मतदार नोंदणी केली आहे.

जुलै ते सप्टेंबर या त्रैमासिकातील मतदार कार्यवाहीत १८ सप्टेंबरपर्यंत राज्यात ९ लाख ८१ हजार ४६३ मतदारांची वाढ नोंदविण्यात आली. तर दुबार व मृत मतदारांची ४ लाख ६१ हजार ८१४ नावे वगळण्यात आली. त्यामुळे मतदार यादीत एकूण वाढ ५ लाख १९ हजार ६४९ इतकी झाली आहे. यात २ लाख ४० हजार ११९ पुरुष तर २ लाख १९ हजार २९७ महिला व १७३ तृतीयपंथीयांचा समावेश आहे. तर याच काळात ५ लाख ५० हजार ७४ दिव्यांग मतदारांची भर पडली आहे. तसेच ५ हजार ४२५ अनिवासी भारतीयांनी देखील मतदार नोंदणी केली आहे.

अशी आहे आगाऊ मतदार नोंदणी-

नंदुरबार ६५३, धुळे १४४७, जळगाव २४९५, बुलढाणा ११०८, अकोला ८७०, वाशिम ४३३, अमरावती ८६५, वर्धा १२६३, नागपूर ४४११, भंडारा ११२०, गडचिरोली ३६६, चंद्रपूर ८७५, यवतमाळ ११३८, नांदेड २३३८, हिंगोली ९९९, परभणी १४८५, जालना १०९७, छत्रपती संभाजीनगर १७१९, नाशिक १९७५, ठाणे ६३७८, मुंबई उपनगर १४८८, मुंबई शहर ३५५, रायगड १०२१, पुणे ४३६१, नगर २५११, बीड ११९३, लातूर २८३६, धाराशीव ३८७६, सोलापूर २३१३ सातारा ११८८, रत्नागिरी ६२९, सिंधुदुर्ग २७७, कोल्हापूर २०१८, सांगली १५१३, पालघर ५३२ एकूण ६०७४८

राज्यात २७ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाणार आहे त्यानंतर २७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत पुन्हा मतदार नोंदणी केली जाणार आहे व त्याची अंतिम मतदार नोंदणी मतदार यादी ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. आगाऊ मतदार नोंदणीचा पर्याय खुला केल्याने राज्यातून त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

- श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रVotingमतदान