पुणे : राज्यात साथीचे आजार बळावल्यामुळे रुग्णांची रक्ताची तपासणी व इतर उपचारांसाठी रुग्णांची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे. डेंगीसह संशयित आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, खासगी ठिकाणी रक्ताच्या तपासणीसाठी अवाजवी शुल्क आकारण्यात येत आहे. याबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर डेंगीच्या रक्त तपासणीसाठीसहाशे रुपयेच शुल्क आकारण्यात यावे, असे आदेश शासननिर्णयाद्वारे देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेंद्र जगताप यांनी दिली.ते म्हणाले, वाढत्या साथीचे आजारांमुळे खासगी रुग्णालय व रक्ताच्या तपासण्यांसाठी नागरिकांकडून अवाजवी शुल्क आकारल्याच्या तक्रारीवरून शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने २८ सप्टेंबर २०१७ रोजी तपासणीच्या शुल्काबाबत हा शासननिर्णय जारी केला आहे़ डेंगी आजाराच्या निश्चितीसाठी खासगी रुग्णालय, वैद्यकीय व्यावसायिक व प्रयोगशाळांनी सहाशे रुपयांपेक्षा जास्त पैसे आकारू नयेत. डेंगीच्या निश्चित निदानासाठी आवश्यक (ठर1, एछकरअ व टअउ, एछकरअ) या तपासण्यांसाठी प्रत्येकी सहाशेच रुपये आकारण्यात यावेत, तसेच निश्चित निदानासाठी रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट किटचा वापर करण्यात येऊ नये, असे आदेश या शासननिर्णयाद्वारे देण्यात आले आहेत. जगताप म्हणाले, मात्र या महत्त्वपूर्ण शासननिर्णयाबाबत सर्व खासगी रुग्णालये व प्रयोगशाळा यांना याची माहिती देण्याचे आदेश देखील राज्याचे संचालक, आरोग्य सेवा विभाग यांना दिले आहेत.ससून, वायसीएम, महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय व नायडू हॉस्पिटल येथे रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचार घेत आहेत. खासगी रुग्णालयातही दाखल व उपचार घेणाºया रुग्णांची संख्या मोठी आहे.राज्यात डेंगीचे २१ बळीराज्याच्या आरोग्य सेवा विभागाकडील उपलब्ध माहितीनुसार राज्यात सुमारे ३८ हजार संशयित रुग्णांच्या रक्ततपासणीत ४,७९७ डेंगीचे रुग्ण आढळले, तर २०१७ या वर्षात आतापर्यंत २१ रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला असून, त्यातील सर्वाधिक १७ रुग्ण हे मुंबईतील आहेत.राज्यातील ३७ रुग्णालयांतून डेंगीची तपासणी व उपचारासाठी यंत्रणा उपलब्ध आहे. डेंगीची लागण झालेल्या रुग्णांबाबतची माहिती त्वरित संबंधित नगरपालिका, महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आरोग्य विभागाकडे द्यावी, असे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे.
डेंगी तपासणीसाठी ६०० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 1:33 AM