प्रत्येक मतदान केंद्रावर वोटर फॅसीलीटेशन सेंटर,मतदान मदत कक्ष,आरोग्य कक्ष,अपंग व ज्येष्ठांसाठी प्रतिक्षालय महिलांसाठी तात्पुरते पाळणाघर व हात धुण्यासाठीचा कक्ष असे सहा कक्ष उभारण्यात आले आहेत. त्यामुळे मतदारांना कुठलाही त्रास होत नाही.याशिवाय पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात होता.अतिरिक्त साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार अजित पाटील यांनी मतदान केंद्रांना भेट देवून परिस्थितीची पाहणी केली.
भोर वेल्हे तालुक्यात शिक्षक मतदार संघात एकुण मतदान (७९.१५%) मतदान झाले आहे.
--
गावनिहाय मतदान असे
भोलावडे (९२.६%),भोर (८१.२७),आंबेघर (६९.२३),किकवी (६३.६४%),नसरापुर (८०.२६%) भोर तालुक्यात एकुण ८०.५६% वेल्हे तालुका विझर (७१.४३%) पानशेत (८८.२४%). पदवीधर मतदार संघात भोर वेल्हे तालुक्यात ६०.८५% मतदान झाले आहे. भोलावडे(६८.६%),भोर (६३.५१%),आंबेघर (६०.२३%)
किकवी (५५.९७%),नसरापुर (५५.६%),वेल्हे तालुक्यात विझर (६९.५०%) पानशेत ३८.४६%).