डिंभे : डिंभे धरणाची पाणीपातळी आजमितीस ७१२.२१० एवढी झाली असून धरणात ६१.१४ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी याच तारखेला धरणात केवळ ३५.९३ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक होता. चालू हंगामात धरण पाणलोट क्षेत्रात एकूण ६२४ मि.मी. एवढा पाऊस झाल्याची नोंद झाली असल्याची माहिती कुकडी प्रकल्प नारायणगांव कार्यालयाकडू देण्यात आली आहे.
संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. २० जुलैला या धरणात केवळ २९.६६ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक होता. या तारखेपर्यंत धरण परिसरात केवळ ३०० मी.मी. पाऊस झाला होता. मात्र २१ जुलैच्या मध्यरात्रीपासून आंबेगांव तालुक्याच्या आदिवासी भागात मुसळधार पावसास सुरूवात झाली केवळ एका दिवसात ३८ मी.मी पाऊस होऊन धरणसाठा ३३.७९ टक्क्यांवर गेला. तेव्हापासून पुढील आठ दिवस डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने धरणसाठा झपाट्याने वाढत गेल्याचे चित्र आहे.
डिंभे धरणात सध्या ६९.१४ टक्के पाणीसाठा झाला असून, आठ दिवसांत धरण पाणीपातळी ७००.२५० वरून ७१२.२१० वर आली आहे. (छायाचित्र-कांताराम भवारी)