याप्रकरणी विक्रमसिंग गोविंदसिंग राजपुरोहित (वय ३०, रा. संभाजीनगर, श्रीलीला हाईट्स, फ्लॅट नंबर ६०२, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली. राजपुरोहित यांचे कदमवस्ती येथे मधुरा गिफ्ट टाईजचे दुकान आहे. बुधवारी (दि. ११) नेहमीप्रमाणे सकाळी ८ च्या सुमारास त्यांनी दुकान उघडले. दुपारी १२ च्या सुमारास त्यांना दुकानात विक्रीकरिता सायकली आणायच्या होत्या म्हणून एकाकडून ५० हजार रुपये हातउसने घेऊन त्यांनी ते दुकानातील ड्रॉव्हरमध्ये ठेवले व सामान आणण्यासाठी पुण्यात गेले. परत आल्यानंतर त्यांचेकडील ३ व दुकानात दिवसभरात झालेला धंद्याचे ८ असे एकूण ६१ हजार रुपये दुकानातील ड्रॉव्हरमध्ये ठेवून रात्री ८ वाजता दुकान बंद करून ते घरी निघून गेले. गुरुवारी (दि. १२) रात्री २.४० च्या सुमारास अनिकेत सुदाम गायकवाड हे टेम्पो घेऊन जात असताना त्यांना राजपुरोहित यांच्या दुकानाचे शटर उचलटलेले दिसले. याची माहिती त्यांनी राजपुरोहित यांना दिली. ते दुकानात आले असता शटर अर्धवट उघडे असलेले दिसले. आत जाऊन पाहणी केली असता त्यांना ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले ६१ हजार रुपये दिसले नाही. त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कदमवाकवस्तीत दुकानातून ६१ हजार केले लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:13 AM