शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Pune: मराठा आंदोलनामुळे पुण्याहून बीड, लातूरकडे जाणाऱ्या ६२ एसटी गाड्या रद्द

By अजित घस्ते | Published: October 30, 2023 3:05 PM

गेल्या दोन दिवसांत बीड आणि नांदेडमध्ये बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे....

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. याला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात बसवर दगडफेक करण्यात आल्याने शिवाजीनगर आगारातून मराठवाड्यातील बीड, लातूरकडे जाणार्या ६२ येणाऱ्या एसटी बसेस सोमवार पासूनरद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना काही वेळा बसस्थानकावर बसची वाट वाहत थांबावी लागली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक होत आहेत. गेल्या दोन दिवसांत बीड आणि नांदेडमध्ये बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर एसीटी महामंडळाचे नुकसान होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या शिवाजीनगरहून, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूरकडे जाणाऱ्या एसटी बस रद्द करण्यात आली आहे. तर लातूर, बीडहून येणाऱ्या एसटी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना एसटी उपलब्ध नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागला आहे. तर तर विदर्भ, नागपूरहून पुण्याला येणारी बसदेखील बंद करण्यात आलेली आहे. स्वारगेट आगारातून नियमित ठिकाणी बस सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापुढे वातावरण निवळल्यानंतरच लातूर, बीड या ठिकाणी बस सोडण्यात येणार असल्याचे, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

मराठा आरक्षणाला हिंसक वळण लागत असल्याने दोन दिवसापांसून एसीटी महामंडळाचे नुकसान होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या मराठवाड्याकडून येणा-या बीड, लातूर ,विदर्भ येणा-या गाड्या येत नाही तर शिवाजीनगरहून, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूरकडे जाणाऱ्या अशा ६२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील निर्णय होई पर्यत प्रवाशांनी काळजी घ्यावे असे आवाहन ही करण्यात येत आहे.- ज्ञानेश्वर रणावरे, शिवाजीनगर आगार प्रमुख

दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरवरून बहिणेकडे आली होती. मात्र मराठवाड्याकडे जाणाऱ्या गाड्या बंद असल्याने परत एसटीने जाण्यासाठी अचडण झाली आहे.

- मनिषा कांबळे, प्रवाशी

टॅग्स :PuneपुणेBeedबीडlaturलातूरMarathwadaमराठवाडा