शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पुणे मेट्रोला लागणारी ६५ टक्के वीज सौर ऊर्जेतून निर्माण होणार; वर्षाला २ कोटी वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 12:38 PM

एवढीच वीज नेहमीप्रमाणे ऊत्पादित केली तर वर्षाला २५ हजार टन कार्बन पर्यावरणात सोडला जाईल. तो वाचणार आहे.

ठळक मुद्देवर्षाला २५ हजार टन कार्बनवर प्रतिबंध

पुणे: मेट्रोला लागणाऱ्या एकूण विजेपैकी ६५ टक्के वीज सौर ऊर्जेतून मिळवण्यात येणार आहे. त्यासाठी मेट्रोची सर्व स्थानके, व्यापारी संकूले, डेपो यांच्या छतांवर सौर पँनेल्स बसवण्यात येणार आहेत.पुण्यात मेट्रोचे वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असे ३१ किलोमीटरचे दोन मार्ग आहेत. त्यातील स्वारगेट ते शिवाजीनगर हा ५ किमीचा भूयारी मार्ग वगळता २६ किमीच्या मार्गावर २५ स्थानके आहेत. त्या सर्व स्थानकांच्या छतांवर सौर पँनेल्स असतील. त्याशिवाय वनाज, स्वारगेट व पिंपरी चिंचवड येथील व्यापारी संकूल व मेट्रोच्या अन्य इमारतींवरही अशीच पँनेल्स असतील. 

राज्यात वीज ऊत्पादनाची मक्तेदारी फक्त महावितरणची आहे. त्यामुळे खासगीपणे वीज ऊत्पादीत केली तरी ती महावितरणला द्यावी लागते. मेट्रो मात्र त्यांनी निर्माण केलेली वीज थेट त्यांच्या स्थानक व अन्य आस्थापनांसाठी वापरू शकतील. तसा करार महावितरणबरोबर करण्यात येणार आहे. मेट्रोला लागणार्या एकूण विजेपैकी ६५ टक्के वीज यातून मिळेल असा अंदाज आहे. एवढीच वीज नेहमीप्रमाणे ऊत्पादित केली तर वर्षाला २५ हजार टन कार्बन पर्यावरणात सोडला जाईल. तो वाचणार आहे. याशिवाय एरवीच्या विजेसाठी येणारा वार्षिक २ कोटी रूपयांचा मेट्रोचा खर्चही वाचणार आहे. 

नागपूर मेट्रोमध्ये हा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आला. तिथे या सौर पँनेल्समधून मोठ्या प्रमाणावर वीज तयार होते आहे. त्याचा वापर मेट्रो स्थानकांमधील विजेसाठी करण्यात येतो. पुण्यातही असाच प्रकल्प करण्यात येणार असून त्याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे. हेमंत सोनवणे, संचालक, महामेट्रो (जनसंपर्क) (२१७)

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोelectricityवीजenvironmentपर्यावरण