गणेशोत्सवात ६५० जादा बसेस भाविकांच्या सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 08:47 PM2018-09-11T20:47:29+5:302018-09-11T20:49:55+5:30
गणेशोत्सवादरम्यान उपनगर तसेच बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या गणेशभक्तांची संख्या खुप असते. रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी गर्दी असते.
पुणे : गणेशोत्सवाच्या कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून सुमारे ६५० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. दि. १३ ते २३ सप्टेंबरदरम्यान रात्री दहानंतरच्या सर्व बसेस यात्रा स्पेशल म्हणून धावतील, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
गणेशोत्सवादरम्यान उपनगर तसेच बाहेरगावाहून शहरात येणाºया गणेशभक्तांची संख्या खुप असते. रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी गर्दी असते. या भाविकांच्या सोयीसाठी पहिल्या टप्प्यात दि. १३ ते १६ सप्टेंबरदरम्यान १७० तर दुसऱ्या टप्प्यात दि. १७ ते २३ सप्टेंबरदरम्यान प्रवाशांच्या गरजेनुसार ६४९ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. रात्री दहानंतर धावणाऱ्या यात्रा स्पेशल बसेसला पाच रुपये जादा तिकीट दर असेल. तसेच पासधारकांना केवळ रात्री बारापर्यंतच पासवर प्रवास करता येईल. रात्री १ वाजेपर्यंत यात्रा बस संचलनात राहतील. त्यानंतर कुठलाही चालणार नाही. शहराच्या मध्य भागातील रस्ते सायंकाळी बंद केले जातात, त्यामुळे या मार्गावरील बस पयार्यी मागार्ने सुरू राहतील, असे प्रशासनाने कळविले आहे.
------------------
गणेशोत्सवात रात्रीच्यावेळी सोडण्यात येणाऱ्या बस
स्थानक शेवटचे ठिकाण
१. स्वारगेट बसस्थानक- धनकवडी, भारती विद्यापीठ, आंबेगाव, अप्पर इंदिरानगर, सुखसागरनगर, मार्केटयार्ड, पुणे स्टेशन, सांगवी,आळंदी
२. नटराज हॉटेल- वडगाव, धायरी, सिंहगड, खानापुर
३. स्वारगेट डेपो स्थानक- हडपसर, कोंढवा
४. महात्मा गांधी स्थानक- कोंढवा खुर्द, कोंढवा बुर्दुक, साळुंके विहार
५. हडपसर गाडीतळ- स्वारगेट, पुणे स्टेशन, मनपा भवन, सासवड, उरूळी कांचन, मांजरी, थेऊर, वडकी गाव, फुरसुंगी, देवाची उरूळी.
६. ससुन रोड - विश्रांतवाडी, धानोरी, विद्यानगर, विमाननगर, वडगाव शेरी, आळंदी.
७. डेंगळे पुल - लोहगाव, वडगाव शेरी, मुंढवा गाव, शुभम सोसायटी, आनंद पार्क, तळेगाव ढमढेरे, हडपसर.
८. मनपा भवन- भोसरी, चिंचवड, निगडी, देवाची आळंदी, देहूगाव, विश्रांतवाडी, विद्यानगर, पाषाण, सुतारवाडी, बालेवाडी, म्हाळुंगे गाव, तळेगाव दाभाडे, सांगवी, पिंपळे गुरव, प्राधिकरण, खडकी बाजार.
९. काँग्रेस भवन- कर्वेनगर, माळवाडी, कोंढवागेट, कोथरूड डेपो
१०. डेक्कन जिमखाना- कर्वेनगर, माळवाडी, कोंढवा गेट, गोखले नगर, कोथरुड डेपो.
११. मनपा नदीकाठ- बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, अभिनव
१२. कात्रज, धनकवडी, स्वारगेट, अप्पर डेपो
१३. निगडी, भोसरी, मनपा भवन
चिंचवड गाव
(दि. १६ ते २३ सप्टेंबरपर्यंत प्रवाशांच्या मागणीनुसार स्वारगेट ते निगडी या मार्गावर रात्री जादा बसेस सोडण्यात येतील.)