शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

पुणे जिल्ह्यातील ६५ हजार नागरिकांना मिळणार शरद भोजन योजने अंतर्गत अन्नधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 4:16 PM

जिल्ह्यातील २४ हजार ३७२ कुटुबांमधील ६५ हजार ७९९ नागरिकांना गहू आणि तांदुळ वाटप करण्यात येणार

ठळक मुद्देयोजनेचा तिसरा टप्पा : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून होणार वाटपखेड तालुक्यात सर्वाधिक ४ हजार २३८ कुटुंब लाभार्थी लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही आणि योजनेचा गैरवापर होणार नाही याबाबत सूचना अडीच किलो गहू आणि अडीच किलो तांदुळ असणार

पुणे : संचाबंदीमुळे वृद्ध, दिव्यांग आणि गरोदर मातांना दोनवेळचे जेवण मिळण्यासाठी कागदपत्रे नसणा-यांना देखील अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. जिल्ह्यातील असे गरजु लाभार्भी निश्चित करण्यात आले असून शरद भोजन योजने अंतर्गत जिल्ह्यातील २४ हजार ३७२ कुटुबांमधील ६५ हजार ७९९ नागरिकांना गहू आणि तांदुळ वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.देशात आणि राज्यात लॉकडाऊन जाहिर झाले. यामुळे अनेक कामगार राज्यात अडकुन पडले. काम बंद  पडल्याने तसेच जवळ पैसे नसल्याने त्यांच्या कुटुंबियांची गैरसोय होत होती.  अशापैकी त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, परंतु ते त्यांच्या जिल्ह्याचे असल्याने त्यांना त्याद्वारे जिल्ह्यात लाभ मिळत नव्हता. त्यासाठी कागदपत्रे नसलेल्या आणि रेशन खरेदी करू न शकणा-या नागरिकांना जिल्हा परिषदेने शरद भोजन योजनेच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.या साठी जिल्ह्यात आठ दिवस सर्वेक्षण करण्यात आले. त्या द्वारे लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. तर  काही नागरिकांचे अर्ज अपलोड करणे शिल्लक आहे, असे असले तरी काही काळासाटी हे सर्वेक्षण थांबवून, मंगळवार (दि.२८) पर्यंत घेण्यात आलेल्या आकडेवारीनुसार लाभार्थ्यांना येत्या १ मे पासून प्रत्यक्षात धान्य वाटप करण्यास सुरूवात करण्यात येणार आहे..................खेड तालुक्यात सर्वाधिक ४ हजार २३८ कुटुंब लाभार्थी आहेत. शिरूरमध्ये ४ हजार १२४ कुटुबांतील ११ हजार २६० नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे. तर नगपालिका हद्दीमध्ये सर्वाधिक जेजुरी नगरपालिका हद्दीमध्ये ६१६ कुटांबातील १ हजार ११३ नागरिकांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. मुळशी तालुक्यात ४ हजार १७ कुटुबांतील ११ हजार १३८ नागरिकांना, हवेलीमधील ३ हजार ४८४ कुटुबांतील ९ हजार २१० नागरिकांना, दौंडमधील १  हजार ८३१ कुटुबांतील ५ हजार ३०७ नागरिकांना, पुरंदरमधील १ हजार ५२१ कुटुबांतील ३ हजार ८८९ नागरिकांना, भोरमधील १ हजार ४९६ कुटुबांतील ४ हजार १०२ नागरिकांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये अडीच किलो गहू आणि अडीच किलो तांदुळ असणार आहेत................................शरद भोजन योजना गरजुंसाठी लाभाची ठरत आहे. या योजनेच्या तिसरा टप्यात लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे पासून करण्यात येणार आहे.  प्रत्येक व्यक्तीला गहू आणि तांदुळ देण्यात येणार आहे. कोणताही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही आणि योजनेचा गैरवापर होणार नाही याबाबत सूचना केलेल्या आहेत.- रणजीत शिवतरे, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद--------------------------

टॅग्स :PuneपुणेKhedखेडShirurशिरुरJejuriजेजुरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार