कन्हेरसर ते झोडकवाडी या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या ठिकाणी रस्ते व पुलाचे काम व्हावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे केली होती. याकामी आढळराव पाटील यांनी तत्कालीन युती शासनाकडे तसेच जिल्हा वार्षिक आराखड्यातून कामाला मंजुरी मिळावी यासाठी आग्रह धरला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे या कामासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन रामा १०३ कन्हेरसर ते झोडकवाडी-मुक्ताईनगर रस्ता सुधारणा करणे कामासाठी ३ कोटी १२ लक्ष निधीला २०१९ मध्ये मंजुरी मिळून नुकतीच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. याचबरोबर कन्हेरसर ते झोडकवाडी पूल बांधणे रु. ३ कोटी ८८ लाख या कामाला १५ मार्च २०२० रोजी मंजुरी मिळाली आहे. येत्या महिनाभरात या कामाचीदेखील निविदा प्रक्रिया पूर्ण होईल, असे माजी खासदार आढळराव पाटील यांनी या वेळी ग्रामस्थांना सांगितले.
या वेळी पाबळचे माजी सरपंच सोपान जाधव, पाबळ उपसरपंच राजाराम वाघोले, कन्हेरसर वि. का. सोसायटीचे चेअरमन एकनाथ दौंडकर, कन्हेरसरचे माजी सरपंच संदीप दौंडकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब खरपुडे, कन्हेरसर ग्रा. पं. सदस्य रुपेश दौंडकर, शिवसेना विभागप्रमुख संतोष दौंडकर, पाबळ ग्रा.पं. सदस्य सचिन वाबळे, दिलीप दप्तरी, भगवान लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ झोडगे, रामदास आगरकर, अनिल जाधव, महेश सिनलकर आदी उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : ३० राजगुरुनगर आढळराव पाटील
फोटो ओळ: कन्हेरसर व पाबळ ग्रामस्थांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आभार व्यक्त केले.