पुणे: पुणे महापालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला २०२३-२४ या अर्थिक वर्षात १८ लाख ७६ हजार पर्यटकांनी भेट दिली असल्याने सुमारे पावणे सात कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात या संग्रहालयात सुमारे पावणे आठ कोटीचे उत्पन्न मिळाले होते. त्यामुळे राजीव गांधी प्राणी संग्रहालयालाच्या उत्पन्नात १ कोटीने घट झाली आहे.
कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय हा एकूण १३० एकरांचा परिसर तीन भागांमध्ये विभागला गेला आहे. येथे प्राणी अनाथालय, सर्पोद्यान आणि प्राणी संग्रहालय आहे. १९९९ साली स्थापन करण्यात आलेल्या प्राणी संग्रहालयात सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणाऱ्या प्राण्यांच्या सुमारे ६६ प्रजाती येथे आहेत. सुटीच्या दिवशी तसेच उन्हाळी आणि दिवाळीच्या सुटीत प्राणी संग्रहालयात पर्यटकांची मोठी गर्दी असते. प्राणी संग्रहालायाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या तिकीट विक्री आणि इलेक्ट्रिक बॅटरीवरील गाडीतून वर्षभरात ६ कोटी ७२ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. एकूण पर्यटकांमध्ये १ हजार ५८३ विदेशी पर्यटकांनीही भेट दिली.
राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला २०२३-२४ या अर्थिक वर्षात १८ लाख ७६ हजार पर्यटकांनी भेट दिली असल्याने पावणे सात कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. या संग्रहालयाचे तिकीट ऑनलाइनही काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राजकुमार जाधव, संचालक ,राजीव गांधी प्राणी संग्रहालय