शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

पालिकेच्या खोदकामात तुटल्या ७ वीजवाहिन्या

By admin | Published: May 12, 2017 5:29 AM

पुणे महानगरपालिकेच्या खोदकामात तुटलेल्या येरवड्यामधील चार वीजवाहिन्यांची दुरुस्ती केल्यानंतर, अवघ्या १२ तासांतच

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे महानगरपालिकेच्या खोदकामात तुटलेल्या येरवड्यामधील चार वीजवाहिन्यांची दुरुस्ती केल्यानंतर, अवघ्या १२ तासांतच त्याच खोदकामाच्या ठिकाणी साचलेल्या पाणी व सुरू असलेल्या खोदकामामुळे गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास पुन्हा सात वीजवाहिन्या तुटल्या. परिणामी वाडिया व बंडगार्डन परिसरात विजेच्या भारव्यवस्थापनासाठी तीन तासांचे चक्राकार पद्धतीने दिवसभर भारनियमन करावे लागले. दरम्यान, खोदकाम करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येरवड्यामधील डॉ. आंबेडकर चौकात पुणे महानगरपालिकेकडून पावसाळी ड्रेनेज पाइपलाइन टाकण्यासाठी जेसीबीने खोदकाम काम सुरु आहे. मंगळवारी (दि. ९) पहाटे अडीच वाजताच्या सुमारास या खोदकामात चार वीजवाहिन्या तुटल्याने वाडिया व बंडगार्डन परिसरात भारनियमन करावे लागले होते. याशिवाय विश्रांतवाडी परिसरातील काही भागातही वीजपुरवठा खंडित झाला होता. या तुटलेल्या चारही वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम बुधवारी (दि. १०) दुपारी अडीच वाजता पूर्ण झाले. परंतु अवघ्या १२ तासांच्या कालावधीनंतर त्याच खोदकामाच्या ठिकाणी साचलेले पाणी वाढल्याने व सुरू असलेल्या खोदकामामुळे गुरुवारी पहाटे चार वाजता पुन्हा सात वीजवाहिन्या तुटल्या. त्यामुळे नायडू उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या जहाँगिर हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, कॉनरॅड हॉटेल, ताडीवाला रोड, ढोले पाटील रोड, मंगलदास रोड, नालोर रोड, प्रायव्हेट रोड, आरटीओ आॅफिस परिसर, लडकतवाडी, सोहराब हॉल, बंडगार्डन रोड, बोट क्लब रोड आदी परिसरातील ९ हजार वीजग्राहकांना फटका बसला. या परिसरात आज पुन्हा तीन तासांच्या चक्राकार पद्धतीचे भारनियमन करावे लागले. रास्तापेठ मंडलचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे, कार्यकारी अभियंता मुरलीधर येलपले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी यांनी उपस्थित राहून दुरुस्ती काम सुरु केले. या वीजवाहिन्यांची दुरुस्ती आज मध्यरात्रीनंतर पूर्ण होईल. या सर्व प्रकारात महावितरणचे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुणे महानगरपालिकेच्या संबंधित कंत्राटदाराविरुद्ध महावितरणकडून येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार कंत्राटदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.