इंदापूर (बाभूळगाव): वरकुटे बु. येथे ७० वर्षीय वयोवृृद्ध माता पित्याला त्यांच्याच पोटच्या मुलाने औषधोपचार करण्यास नकार देत मारहाण केल्याची घटना घडली. याबाबतची याबाबतची फिर्याद प्रताप बाबुराव फाळके (वय ७०, रा. वरकुटे बु. ता.इंदापूर, जि. पुणे) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रविंद्र प्रताप फाळके (रा. वरकुटे बु.,ता.इंदापूर जि.पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी पती पत्नी हे वयोवद्ध व जेष्ठ नागरिक आहे. ते आरोपीचे आई-वडील आहेत. वरील सर्वजण एकत्रित राहण्यास आहेत. आरोपीने दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता त्याचे आई वडिलांचे आजारपणासाठी औषधोपचार करण्यास व त्यांचा सांभाळ करण्यास नकार देत फिर्यादी वृृृृद्ध माता पित्याला लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली होती.
आई - वडील वयोवद्ध आहेत हे आरोपीला माहीत असताना देखील आरोपीने वद्ध आईवडिलांच्या वयाचा विचार न करता त्यांना मारहाण केली.त्यामुळे वडील प्रताप फाळके यांनी इंदापूर प्रभारी पोलीस निरिक्षक धन्यकुमार गोडसे यांची भेट घेवून घडलेल्या प्रकाराबाबतची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक गोडसे यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे संबंधितांना आदेश दिले. त्यानंतर आरोपीविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ————————————————————————ज्येष्ठ नागरिकांचा त्यांच्या मुलांनी सांभाळ न करणे, त्यांची छळवणुक करणे, त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देणे, त्यांना घरातुन बाहेर हाकलुन देणे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत आहेत. पुढील काळात घरातील ज्येष्ठ, वयोवृद्ध नागरिकांच्या बाबतीत वरील प्रकारच्या तक्रारी आल्यास कडक कारवाई करणार करणार आहे. इंदापूर प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे.