शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

बालेवाडी कोरोना रुग्णालयातून वृद्ध पळाला; १७ किलोमीटर चालत घरी पोहचला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 7:17 PM

ही व्यक्ती येरवड्यात आल्याचे नागरिकांनी पालिकेला कळविल्यावर एकच धावपळ उडाली.

ठळक मुद्देपुन्हा घरी नेण्याकरिता बोलवावे लागले बाधित मुलालाबालेवाडी येथील विलगीकरण कक्षासाठी जवळपास १२०० खोल्या उपलब्ध

पुणे : विलगीकरणाला कंटाळलेल्या एका वृद्धाने बलेवाडी क्रीडा संकुलमधून पळ काढत तब्बल १७ किलोमीटरचे अंतर पायी चालत येरवड्यातील घर गाठले. ही व्यक्ती येरवड्यात आल्याचे नागरिकांनी पालिकेला कळविल्यावर एकच धावपळ उडाली.पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील एका कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना बधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अन्य व्यक्तींना बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. यामध्ये संबंधित ७० वर्षीय वृद्ध बुधवारी विलगीकरण कक्षामधून गायब झाला. या व्यक्तीचा सर्वत्र शोध सुरू करण्यात आला. दरम्यान, १७ किलोमीटर चालत चालत ही व्यक्ती येरवड्यातील त्यांच्या घरी पोचली होती. या व्यक्तीला घराच्या बाहेर बसल्याचे पाहिल्यावर स्थानिक नागरिकांनी नगरसेवकामार्फत पालिकेला संपर्क साधत माहिती कळविली. पालिकेचे पथक रुग्णवाहिकेसह दाखल झाले. त्यांनी या व्यक्तीला सोबत येण्याची विनंती केली. परंतु, ही व्यक्ती परत जाण्यास तयार नव्हती. पालिकेच्या रुग्णवाहिकेमधून जाण्यास ही व्यक्ती तयार होत नव्हती. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शक्कल लढवत कोरोनाचे उपचार घेत असलेल्या त्या व्यक्तीच्या मुलाला रुग्णालयातून बाहेर आणले. त्यांना घरी आणत वडिलांना विलगिकरण कक्षात जाण्याची विनंती त्यांच्या मुलाने केली. मुलाने बराच वेळ मिनतवाऱ्या केल्यावर शेवटी ही वृद्ध व्यक्ती रुग्णवाहिकेमधून जाण्यास तयार झाली. त्यांना रुग्णवाहिकेमधून विलगीकरण केंद्रावर नेण्यात आले. ----------पत्रे लावून मार्ग करणार बंदबालेवाडी येथील विलगीकरण कक्षासाठी जवळपास १२०० खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून आतापर्यंत ६५० नागरिक याठिकाणी आणण्यात आले आहेत. या नागरिकांना बाहेर जाता येऊ नये याकरिता आता केवळ एकच मार्ग ठेवण्यात येणार असून अन्य मार्ग पत्रे लावून बंद करण्यात येणार आहेत. यासोबत पालिकेने पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेBalewadiबालेवाडीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर