पुणे: Corona Updates in Pune City: शहरात आतापर्यंत ७ ओमायक्रॉनबाधित (Omicron) रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील दररोजच्या कोरोना चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. सध्या दररोज सरासरी ६ ते ७ हजार चाचण्या केल्या जात आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.
शहरात १ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत २१९४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. या कालावधीत शहरात १ लाख ४१ हजार ५५१ चाचण्या झाल्या. महिन्याभरात शहराचा पॉझिटिव्हिटी दर १.५४ टक्के इतका नोंदवला गेला आहे. सरत्या महिन्यात सर्वाधिक कमी रुग्णसंख्या २० डिसेंबर रोजी ३३ इतकी नोंदवली गेली. २५ डिसेंबर रोजी या कालावधीतील १४९ इतके सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. चाचण्यांची संख्या वाढवल्याने रुग्णसंख्येतही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या आठवड्यातील कोरोना आकडेवारी :
दिवस | चाचण्या | रुग्ण |
---|---|---|
१९ डिसेंबर | ६३११ | ८४ |
२० डिसेंबर | ४२६९ | ३३ |
२१ डिसेंबर | ४५४३ | ९५ |
२२ डिसेंबर | ६०७७ | १२७ |
२३ डिसेंबर | ६६९२ | ७९ |
२४ डिसेंबर | ७४२९ | १२० |
२५ डिसेंबर | ७५०६ | १४९ |