पुणे : पुणे शहरात गुरुवारी ३ हजार ९१० कोरोना चाचण्या पार पडल्या. त्यापैैकी ३१८रुग्णांमध्ये कोरोनाचे निदान झाले, तर दिवसभरात ७०० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ६४६ इतकी झाली आहे.
शहरात शुक्रवारी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. सध्या १३६ रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. सक्रिय रुग्णांपैैकी रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांचे प्रमाण १७.१५ टक्के इतके आहे. शहरात ४९६ व्हेंटिलेटर बेड, तर ४ हजार ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. आजपर्यंत पुण्यात ४४ लाख ५५ हजार ६३७ कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैैकी ६ लाख ५८ हजार ६४४ कोरोनाबाधितांचे निदान झाले. त्यापैैकी ६ लाख ४६ हजार ६४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ९३३४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.